शनिदेव या तीन राशीत सुवर्णपदांसह भ्रमण करणार, अडकलेली कामंही होणार!
नववर्ष 2025 मध्ये सर्वच ग्रह राशी बदल करणार आहेत. शनि, राहु-केतु आणि गुरु हे ग्रह मोठ्या कालावाधीनंतर राशीबदल करतात. त्यामुळे हे वर्ष खास असणार आहे. शनिदेवांचा गोचर होतोय. पण आपल्या राशीत कोणत्या पावलांनी भ्रमण याबाबत उत्सुकता असते. यावेळी तीन राशींना शनिदेवांचा आशीर्वाद लाभणार आहे.
शनिदेवांना नवग्रहांमध्ये न्यायदेवता म्हणून गणलं गेलं आहे. शनिदेवांच्या तावडीतून कोणीच सुटत नाही. भल्याभल्यांना दंड करून वठणीवर आणण्याची ताकद शनिदेवांमध्ये आहे. त्यामुळे शनिदेव आपल्या राशीला येणार म्हंटलं की धाकधूक वाढते. शनिदेव 2025 या वर्षात गोचर करणार आहेत. जवळपास अडीच वर्षांच्या कालावधीनंतर राशीबदल करणार आहेत. शनिदेव 29 मार्चला रात्री 10 वाजून 7 मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कुंभ राशीला शेवटचा, मीन राशीला मधला आणि मेष राशीला पहिला साडेसातीचा टप्पा सुरु होईल. शनिचा अडीच वर्षांचा कालावधी हा 3 जून 2027 पर्यंत असणार आहे. म्हणजेच जवळपास अडीच वर्षे शनिदेव या राशीत बसणार आहेत. तर सिंह आणि धनु राशीला पनौती म्हणजेच शनीची अडीचकी असणार आहे. त्यामुळे या कालावाधीत काळजी घेणं गरजेचं आहे.
शनिदेवांच्या गोचरात आणखी एक गोष्ट पाहिली जाते. ती म्हणजे कोणत्या पावलांनी शनिदेव आपल्या राशीत आले आहेत. शनिदेव सोनं, तांबं, चांदी आणि लोह चरणाने राशीभ्रमण करतात. शनिदेव 12 राशीतील प्रत्येक तीन राशीत या चरणांसह गोचर करताता. यात सुवर्ण चरणांचा गोचर कालावधी जातकांना चांगला जातो. अडकलेली सर्व कामं मार्गी लागतात. तसेच हातात पैसा खेळता राहतो. 29 मार्चनंतर शनिदेव तूळ, वृषभ आणि मीन राशीत सुवर्ण चरणांनी मार्गक्रमण करणार आहेत.
तूळ : या राशीच्या सहाव्या स्थानात शनिदेव गोचर करणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रखडलेली कामं मार्गी लागतील. समाजात मानसन्मान वाढेल. नोकरी तसेच उद्योगधंद्यात अपेक्षित यश मिळेल.मोठी जबाबदारी या कालावधीत मिळू शकते. शत्रूंकडून होणारा नाहक त्रास या कालावधीत संपुष्टात येईल.
वृषभ : या राशीच्या एकादश भावात शनिदेव गोचर करणार आहेत. या कालावधीत अचानक धनलाभ होऊ शकतो. सामाजिक किंवा राजकीय जीवनात मोठं पद मिळू शकतं. चांगली लाईफस्टाईल या कालावधीत जगता येईल. शत्रुपीडा कमी होईल.
मीन : या राशीत शनिदेव विराजमान होणार आहे. पण 50 दिवसांचा सुरुवातीला काळ त्रासदायक असेल. राहु ग्रहाचं मार्गक्रमण होईपर्यंत त्रास होईल. पण त्यानंतर शनिच्या मधल्या साडेसातीच्या काळात काही उतारचढाव पाहायला मिळतील. पण काही कामं एकदम पक्की होतील. त्यामुळे त्यांचा लाभ आयुष्यभर घेता येईल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)