Shani Ast 2023: शनिदेव कुंभ राशीत पूर्णपणे गेले अस्ताला, 6 मार्चपर्यंतचा काळ तीन राशींसाठी अडचणीचा
Shani Ast 2023: ग्रहमंडळातील शनिदेव अस्ताला गेल्याने राशीचक्रावर परिणाम दिसून येत आहे. असं असताना शनिदेव आता पूर्णपणे निस्तेज अवस्थेत आहे. त्यामुळे 6 मार्चपर्यंतचा काळ तीन राशींना अडचणीचा ठरणार आहे.
मुंबई- शनिदेवांना ग्रहमंडळात न्यायदेवतेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे शनिदेवांच्या स्थितीकडे ज्योतिषाचार्यांचं लक्ष लागून असतं. दुसरीकडे शनिदेवांसोबत एखाद्या ग्रहाने युती केली तर त्याची फळंही तशीच भोगावी लागतात. दुसरीकडे गोचर कुंडलीत एखादा ग्रह सूर्याजवळ गेला की अस्ताला जातो.त्यामुळे त्या ग्रहाचा नकारात्मक प्रभाव सर्वच राशींवर थोडा अधिक प्रमाणात पडतो. अशीच काहीशी स्थिती शनि ग्रहाची झाली आहे. शनि ग्रहाने 17 जानेवारी 2023 रोजी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला. अडीच वर्षांसाठी या राशीत मुक्काम असणार आहे. दरम्यान शनिदेव कुंभ राशीत 31 जानेवारी अस्ताला गेले होते. आता शनिदेव सूर्याच्या एकदम जवळ आल्याने 13 फेब्रुवारीपासून पूर्णपणे निस्तेज झाले आहेत. जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या 4 डिग्रीजवळ येतो तेव्हा पूर्णपणे अस्त झाला असं मानलं जातं. शनिच्या या स्थितीचा तीन राशींना फटका बसणार आहे. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत.
या तीन राशींना होणार त्रास
कर्क: या राशीच्या जातकांना नुकतीच शनिची अडीचकी सुरु झाली आहे. त्यात आता शनिदेव पूर्णपणे अस्ताला गेल्या या राशीवर प्रभाव दिसून येईल. या दरम्यान शनिदेव या राशीच्या सप्तमेश आणि अष्टमेशमध्ये आहेत. शनि या ठिकामी मारकेश स्थितीत आहे. त्यामुळे शनिच्या या स्थितीचा प्रतिकूल परिणाम दिसून येईल. या काळात जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. तसेच गुंतवणूक विचारपूर्वक करा अन्यथा नुकसान होऊ शकतं.
मकर- या राशीच्या जातकांना शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. शनि या राशीचा लग्न स्वामी आहे. या काळात तुमची तब्येत थोडी ढासळू शकते. ताप, सर्दी आणि खोकला होऊ शकतो. त्यामुळे आजारातून बरं होण्यासाठी 6 मार्चपर्यंतचा अवधी लागू शकतो. तसेच जोडीदारासोबत या काळात भांडण होऊ शकतं. तसेच व्यवसायात आर्थिक नुकसान सोसावं लागू शकतं.
कुंभ- सध्या या राशीतच शनिदेव अस्ताला गेले आहेत. या जातकांना शनिची मधली अडीच वर्षांची साडेसाती सुरु आहे.त्यामुळे या राशीच्या लोकांना अडचण होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा अशुभ असेल. शनिदेव कुंभ राशीच्या लग्न आणि 12 व्या राशीचे स्वामी आहेत. त्यामुळे या एखादा गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच आरोग्यविषयक तक्रारी जाणवतील.त्यामुळे या काळात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)