Shani Gochar : शनि करणार राशी बदल; ‘या’ तीन राशींना येणार अच्छे दिन
Saturn Transit Effect On Zodiacs : शनिदेव लवकरच राशी परिवर्तन करणार आहेत. त्याचा ३ राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. शनीच्या साडेसाती बरोबरच शनिच्या धैय्यापासून या राशींना आराम मिळू शकतो.

ज्योतिषशास्त्रानुसार, शनि ग्रह सुमारे अडीच वर्षे एका राशीत राहतो. अशाप्रकारे राशी बदल केल्याने, त्याचा १२ राशींवर वेगवेगळा प्रभाव पडतो. यावर्षी शनिवार, २९ मार्च कर्मफळ दूत मानला जाणारा शनि ग्रह हा स्वतःची राशी सोडून गुरु राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे १२ राशींपैकी काही राशींसाठी साडेसातीची सुरुवात होणार आहे, तर काहींसाठी साडेसातीची समाप्ती होईल आणि काहींसाठी साडेसातीचा प्रभाव कमी होऊ शकतो. शनिच्या भ्रमणाबरोबर, अडीच वर्षांची ही धैय्या एका राशीपासून संपेल आणि दुसऱ्या राशीपासून सुरू होईल.
या काळात 3 राशी अशा असणार आहेत, ज्याना शनीच्या राशी बदलाने खूप फायदा होणार आहे. अच्छे दिन आता या राशींसाठी सुरू होणार आहेत असं म्हणायला हरकत नाही. आज आम्ही तुम्हाला याच 3 राशींबद्दल सांगणार आहे आणि त्यांच्यासाठी नेमकं काय चांगलं घडेल हे देखील सांगणार आहे.
शनिच्या साडेसती आणि धैय्यापासून कोणाची होणार सुटका?
कर्क रास : कर्क राशीच्या लोकांसाठी शनिचे भ्रमण फायदेशीर ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनिची धैय्या संपेल. या राशीच्या लोकांना आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसतील. व्यवसायात नफा होऊ शकतो. नातेसंबंध सुधारतील. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या सर्व समस्यांपासून तुम्हाला आराम मिळू शकेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. आत्मविश्वास वाढेल. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. गुंतवणूक करून नफा होऊ शकतो. शनिची तुमच्यावर विशेष कृया राहील. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मकर रास : मकर राशीच्या लोकांसाठी शनिचे भ्रमण भाग्यवान ठरेल. या राशीच्या लोकांची शनिची साडेसती २९ मार्च, शनिवारी कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करून संपेल. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक चांगले बदल घडू शकतात. सुमारे ३ वर्षांपासून मकर राशीच्या लोकांना अडचणी आणि त्रास सहन करावे लागत होते, परंतु मीन राशीत प्रवेश होताच शनिदेवाचे आशीर्वाद सुरू होतील. कौटुंबिक आनंदाची कमतरता दूर होईल. येणारा काळ या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. व्यवसायापासून ते नोकरीपर्यंत सर्वांना सकारात्मक बदल दिसतील.
कुंभ रास : कुंभ राशीचा स्वामी शनि आहे आणि २९ मार्च रोजी अंतिम टप्पा सुरू होणार आहे. या राशीवरील शनिची ‘साडेसाती’ संपत नाहीये, परंतु त्याचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. व्यवसायात प्रगती होईल. सामाजिक कार्यात रस वाढू शकतो. समाजात आदर वाढू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता राहील. धार्मिक कार्यात रस वाढेल. मन प्रसन्न राहील. व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील. पदोन्नतीची शक्यता असेल ज्यामुळे मन अधिक आनंदी होईल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारू शकतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)