Shani Jayanti 2023: शनि जयंतीला जुळून आला दुर्लभ योग, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Shani Jayanti 2023 Shubh Yog : शनि जयंती या वर्षी 19 मे 2023 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी ग्रहांच्या स्थितीमुळे खास योग जुळून आहे. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखी वाढलं आहे.

Shani Jayanti 2023: शनि जयंतीला जुळून आला दुर्लभ योग, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
Shani Jayanti 2023: शनि जयंतीच्या दिवशी शुभ योगाची स्थिती, जाणून घ्या सर्वकाही
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 11:28 AM

मुंबई : शनिदेव भगवान सूर्यदेव आणि छाया यांचा पुत्र आहे. वैशाख अमावस्येला शनिदेवांचा जन्म झाला होता. नवग्रहांमध्ये शनिदेवांना न्यायदेवतेचा दर्जा देण्यात आला आहे. एकदा शनिदेव राशीत आले की भल्याभल्यांचा निर्णय करतात. शनि साडेसाती, अडीचकी आणि महादशेच्या काळात वाईट काळातून जावं लागतं. शनिदेव वाईट आणि चांगल्या कर्मानुसार शुभ आणि अशुभ फळ प्रदान करतात. त्यामुळे शनिदेवांची कृपा राहावी यासाठी जातक प्रयत्नशील असतात. या वर्षी शनि जयंती 19 मे 2023 शुक्रवारी साजरी केली जाईल. या दिवशी पूजा विधी केल्यास जातकांना काही प्रमाणात दिलासा मिळतो.

शनि जयंती आणि शुभ योग

शनि जयंतीच्या दिवशी शोभन योग असणार आहे. तसेच शनिदेव स्वत:च्या कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे शश योग तयार होत आहे. या व्यतिरिक्त मेष राशीत चंद्र आणि गुरुची युती होत आहे. त्यामुळे अत्यंत शुभ असा गजकेसरी योग तयार होत आहे. त्यामुळे यंदाची शनि जयंती खास आणि महत्त्वपूर्ण असणार आहे.

शनि जयंती शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

वैशाख अमावस्या तिथीचा प्रारंभ 18 मे 2023 रोजी रात्री 9 वाजून 42 मिनिटांनी सुरु होईल. तर समाप्ती 19 मे 2023 रोजी रात्री 9 वाजून 22 मिनिटांपर्यंत असेल. उदय तिथीनुसार शनि जयंती 19 मे रोजी साजरी केली जाईल.

सकाळी लवकर उठून स्नान करून तयार व्हा. यानंतर शनि मंदिरात जाऊन मूर्तीवर तेल, फुलांचा हार आणि प्रसाद अर्पित करा. त्यानंतर चरणांवर काळे उडद आणि तीळ अर्पण करा. तेलाचा दिवा लावा आणि शनि चालिसेचं पठण करा. शनि जयंतीच्या दिवशी गरीबांना अन्नदान करा.

शनि जयंतीच्या दिवशी उपाय

शनि जयंतीच्या दिवशी संध्याकाळी पश्चिम दिशेला दिवा लावा. यानंतर ओम शं शनैश्चराय नम: या मंत्राच्या अकरा माळ जप करा. यामुळ शनिदेव प्रसन्न होतात, असं शास्त्रात सांगितलं आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.