Shani Jayanti 2023 : मे महिन्याच्या या तारखेला शनि जयंती, जाणून घ्या काय करायचं आणि काय नाही ते

ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं गेलं आहे. पण असं असलं तरी पापग्रहांमध्ये त्यांची गणना होते. त्यामुळे शनिचा प्रभाव असताना परिणाम भोगावे लागतात. आता शनि जयंती जवळ येत असून काही उपाय तुमच्यासाठी प्रभावी ठरू शकतात.

Shani Jayanti 2023 : मे महिन्याच्या या तारखेला शनि जयंती, जाणून घ्या काय करायचं आणि काय नाही ते
शनि दोष उपाय
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 2:22 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना न्यायदेवतेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे शनिदेव एकदा राशीला आले की चांगल्या चांगल्यांना घाम फुटल्याशिवाय राहात नाही. शनिची दृष्टी, अडीचकी, महादशा, साडेसाती अशा प्रकारातून जातकांना जावं लागतं. पण असं असलं तरी ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत. त्यासाठी शनि जयंतीचा दिवस खास ठरणार आहे. शनिजयंती वैशाख अमावस्येला साजरी केली जाते.

शनि जयंती 19 मे 2023 रोजी आहे. या दिवशी शनिदेवांची मनोभावे पूजा विधी केल्यास त्याचं चांगलं फळ मिळतं. इतकंच काय तर शनिच्या प्रभावातही दिलासा मिळतो. त्यामुळे शनि जयंतीचा नेमका मुहूर्त कोणता आणि काय उपाय करावे ते जाणून घेऊयात.

शनि जयंतीचा शुभ मुहूर्त

वैशाख अमावस्या तिथी 18 मे 2023 रोजी रात्री 9 वाजून 44 मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 मे 2023 रोजी रात्री 9 वाजून 24 मिनिटांपर्यंत राहील. 19 मे रोजी शुभ मुहूर्त सकाळी 7 वाजून 11 मिनिटांपासून सकाळी 10 वाजून 35 मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपासून दुपारी 2 वाजेपर्यंत राहील. तसेच संध्याकाळी 5 वाजून 25 मिनिटांपासून 7 वाजून 7 मिनिटांपर्यंत राहील. शुभ मुहूर्तात पूजन केल्यास चांगली फळं मिळतात.

शनि अमास्येला काय करायचं काय नाही ते जाणून घ्या

  • हिंदू धर्मात अमावस्येला दान केल्याने पुण्य लाभतं. त्यामुळे शनि जयंतीला आपल्या कुवतीनुसार काळे कपडे, चपला, धान्य, काळी उडद यांचं दान करा. तसेच गरीबांना जेवण द्या.
  • शनिदेव गरीब दुर्बळ व्यक्तींची सेवा केल्याने प्रसन्न होतात. त्यामुळे आपल्याकडून दुर्बळ व्यक्तींना वेदना किंवा दु:ख होईल असं वागू नका.
  • शनिदेवांना मोहरी किंवा तिळाचं तेल अर्पण करा. शनि मंत्राचा जप करा. यामुळे काही अडचणी तात्काळ सुटण्यास मदत होते.
  • कुंडलीत शनि दोष असेल शनिजयंतीला पूजा करताना काळे तीळ, काळी उडद, काळीमिरी, शेंगदाण्याचं तेल, लवंग, तमालपत्र, सैंधव मीठ अर्पण करा. यामुळे शनिचा प्रभाव कमी होतो.
  • शनि जयंतीला कुत्र्यांना त्रास देऊ नका. खोटं बोलू नका. तसेच कोणाची फसवणूक करू नका. अन्यथा शनिदेवांची अवकृपा होते.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती उपलब्ध स्रोतावर आधारित आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. )

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.