Shani : शनिदेव अशा स्थितीत व्यक्तीची करतात आर्थिक कोंडी, गरीबी दारी येण्यापूर्वीच करा हे उपाय

Shani Dev : ज्योतिषशास्त्रात शनिदेव म्हंटलं की चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. कारण शनिदेवांच्या दारात कर्माची फळ भोगावी लागतात. फक्त सौम्य स्वरुपात यावी म्हणून ज्योतिषीय उपाय सांगण्यात आले आहेत.

Shani : शनिदेव अशा स्थितीत व्यक्तीची करतात आर्थिक कोंडी, गरीबी दारी येण्यापूर्वीच करा हे उपाय
शश राजयोग
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 5:57 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना पापग्रहाचा दर्जा देण्यात आला आहे. असं असलं तरी शनिदेव नवग्रहांमध्ये न्यायदेवतेची भूमिका बजावतात. शनिदेव कर्मानुसार जातकांना फळं देतात. शनिदेवांनची कृपा झाली तर एखादा जातक रंकाचा राजा होतो. तर शनिची वक्रदृष्टी पडली तर राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. शनिदेव सर्वात धीम्या गतीने गोचर करतात. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तर एका राशीत पुन्हा येण्यासाठी 30 वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे प्रत्येक राशीच्या जातकाला आयुष्यात शनिदेवांच्या दंडाला सामोरं जावं लागतं.

शनिची वक्रदृष्टी पडली तर जातकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. शनिदेव जातकाला साडेसाती, अडीचकी, महादशा आणि अंतर्दशेत त्रास देतात. त्यामुळे जातकाला काही कळायच्या आताच रसातळाला गेलेला असतो. चला जाणून घेऊयात कोणत्या शनिदेव आर्थिक नुकसान करतात.

शनिच्या साडेसाती आणि अडीचकीत व्यक्तीला शारीरिक अडचणींचा सामना करावा लागतो. एका आजारपणातून सुटका होत नाही तोच दुसरं समस्या मागे लागते. यामुळे व्यक्ती पुरता हतबल होऊन जातो. त्याचबरोबर नोकरी आणि व्यवसायातही अडचणींचा डोंगर उभा राहतो. न्यायलयीन प्रकरणामुळे कुटुंबात वादाचं कारण ठरतं.

शनिची साडेसाती साडे सात वर्षे, अडीचकी अडीच वर्षे, तर महादशा 19 वर्षे आणि त्या अंतर्गत येणारी अंतर्दशा 3 वर्षे आणि 3 दिवसांची असते. शनिची महादशेत शनिची अंतर्दशा आली की सर्वाधिक आर्थिक फटका बसतो. त्याच साडेसाती आणि अडीचकी जुळून आली तर सांगायलाच नको. त्यामुळे आर्थिक डोंगर कोसळतो.

शनिच्या वक्रदृष्टीतून वाचण्यासाठी उपाय

  • शनिवारी छायादान सर्वात शुभ मानलं जातं. या दिवशी मोहरीच्या तेल वाडग्यात घेऊन त्यात चेहरा बघा आणि ते तेल दान करा.
  • गरीब आणि गरजूंना धान्य, कपडे आणि इतर वस्तूंचं दान करा.
  • शनिवारी शनिदेवांना मोहरीचं तेल अर्पण करा. तसेच तेलाचा दिवा लावा.
  • शनिवारी उडदाच्या खिचडीचं गरीब आणि गरजूंना दान करा.
  • शनिवारी काळे तीळ, काळी उडद, काळ्या रंगाचे कपडे दान करा.
  • शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करा.
  • शनिवारी विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करा.
  • शनिवारी काळे कपडे परिधान करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Non Stop LIVE Update
मनसेत नाराज? राज ठाकरेंच्या शिलेदारानं उद्धव ठाकरेंची मशाल घेतली हाती
मनसेत नाराज? राज ठाकरेंच्या शिलेदारानं उद्धव ठाकरेंची मशाल घेतली हाती.
अजित पवार की युगेंद्र पवार? बारामती कोणाची? काका-पुतण्या भिडले
अजित पवार की युगेंद्र पवार? बारामती कोणाची? काका-पुतण्या भिडले.
राणांची यशोमती ठाकूरांवर टीका, 'माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या...'
राणांची यशोमती ठाकूरांवर टीका, 'माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या...'.
'इंजिन-मनसे घेऊन बसा', पक्ष-चिन्हाच्या टीकेवर दादांचं राज यांना उत्तर
'इंजिन-मनसे घेऊन बसा', पक्ष-चिन्हाच्या टीकेवर दादांचं राज यांना उत्तर.
सलमान नंतर बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारच्या जीवाला धोका, आला धमकीचा फोन
सलमान नंतर बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारच्या जीवाला धोका, आला धमकीचा फोन.
राऊतांना 'सिल्व्हर ओक'चा बुलडॉग म्हटल तर चालेल का?, भाजप नेत्याचा सवाल
राऊतांना 'सिल्व्हर ओक'चा बुलडॉग म्हटल तर चालेल का?, भाजप नेत्याचा सवाल.
शरद पवारांच्या निवृत्तीवर अजितदादांचं मिश्कील भाष्य, 'मला तर मागचा...'
शरद पवारांच्या निवृत्तीवर अजितदादांचं मिश्कील भाष्य, 'मला तर मागचा...'.
खोत फडणवीसांचा कुत्रा तर राऊत साप, दोघांच्या भांडणात भाजप नेत्याची उडी
खोत फडणवीसांचा कुत्रा तर राऊत साप, दोघांच्या भांडणात भाजप नेत्याची उडी.
'डुक्कराला कितीही साबण शॅम्पू लावला तरी ते..', खोतांचा राऊतांवर पटलवार
'डुक्कराला कितीही साबण शॅम्पू लावला तरी ते..', खोतांचा राऊतांवर पटलवार.
पवारांवरील त्या वक्तव्यानंतर खोत म्हणाले, 'ही गावगाड्याची भाषा पण...'
पवारांवरील त्या वक्तव्यानंतर खोत म्हणाले, 'ही गावगाड्याची भाषा पण...'.