Shani Sadesati 2023: 30 जानेवारीपासून ‘या’ राशींच्या जिवनात होणार उलथापालथ, शनीदेव देणार कर्माची फळं
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 30 जानेवारी रोजी सकाळी 12.06 ते 6 मार्च रोजी सकाळी 11.36 वाजेपर्यंत शनी मावळती स्थितीत राहील.
मुंबई, ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा सर्वात संथ गतीचा ग्रह आहे. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी अडीच वर्षे लागतात. तर 12 राशींचे चक्र पूर्ण होण्यासाठी 30 वर्षे लागतात. 17 जानेवारीला कर्मफलदाता कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. काही राशींना या संक्रमणाचे (Shani Sadesati 2023) अशुभ परिणाम मिळतील. याशिवाय 13 दिवसांच्या संक्रमणानंतर शनी ग्रह मावळेल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 30 जानेवारी रोजी सकाळी 12.06 ते 6 मार्च रोजी सकाळी 11.36 वाजेपर्यंत शनी मावळती स्थितीत राहील. यानंतर, 17 जून रोजी 10.48 मिनिटांनी ते प्रतिगामी अवस्थेत येईल. शनीच्या अस्तामुळे अनेक राशीच्या लोकांसाठी कठीण काळ सुरू होऊ शकतो. जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी.
या राशींना शनीची साडेसाती सुरू होईल
शनीच्या अस्तामुळे धनु राशीच्या लोकांना साडेसातीसून मुक्ती मिळेल. मकर राशीच्या लोकांवर साडेसतीचा तिसरा पर्व सुरू होईल. त्याच वेळी, दुसरा चरण कुंभ राशीच्या लोकांवर सुरू होईल आणि पहिला चरण मीन राशीच्या लोकांवर सुरू होईल.
यांना अडीचकीमधून मुक्तता मिळेल
तूळ राशीच्या लोकांना शनिच्या अडिचकी पासून आराम मिळेल. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अडिचकीचा टप्पा सुरू होईल. अडिचकीचा शेवट मिथुन राशीवर होईल. याशिवाय कर्क राशीच्या लोकांवर याची सुरुवात होईल.
शनि सती आणि अडिचकीपासून मुक्ती मिळवण्याचे उपाय
- शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. तसेच सात वेळा प्रदक्षिणा करा.
- शनि साडेसातीपासून मुक्ती मिळवण्यासाठी काळ्या घोड्याच्या नाल किंवा बोटीच्या खिळ्याची अंगठी बनवून उजव्या हाताच्या मधल्या बोटात घालावी.
- शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करा. तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
- शनिवारी काळे कपडे, काळे तीळ, ब्लँकेट, लोखंडी भांडी इत्यादी दान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात.
- शनिदेवाला निळ्या रंगाची फुले अर्पण करा. त्याचबरोबर ओम शं शनैश्चराय नमः मंत्राचा जप करावा.
- हनुमानजींची पूजा केल्याने शनीच्या दोषांपासूनही मुक्ती मिळते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)