मुंबई, शनि हा सर्वात हळू चालणारा ग्रह आहे. त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षे लागतात. सध्या मिथुन आणि तूळ राशीच्या शनीची साडेसाती (Shani Sadesati 2023) सुरू आहे. शनिदेव मकर राशीत आहेत, 17 जानेवारी रोजी ते कुंभ राशीत प्रवेश करतील, जिथे ते 29 जानेवारी 2025 पर्यंत सुमारे अडीच वर्षे राहतील. कुंभ राशीत प्रवेशासोबतच शनि कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांच्या कर्मांवरदेखील लक्ष ठेवतील. या राशीच्या लोकांसाठी जैसे कर्म तैसे फळ असा हा काळ राहणार आहे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे याबद्दल जाणून घेऊया.
शनीची साडेसाती साडेसात वर्षे चालते, ज्यामध्ये अडीच वर्षांचे तीन तीन टप्पे असतात. अशाच प्रकारे जेव्हा शनि तुमच्या राशीपासून चौथ्या व आठव्या राशीत प्रवेश करतो तेव्हा पुढची अडीच वर्षे ही ‘अडीचकी’ किंवा पनवतीची असतात असे मानले जाते. म्हणून साडेसाती संपल्यावर अडीच वर्षांनंतर पुन्हा चौथा शनी येतो तेव्हा अडीचकी येते. तसेच साडेसाती संपल्यावर साधारणत: साडेबारा वर्षांनंतर शनी आठवा होतो, तेव्हाही अडीचकी येते.
अहंकाराला मुरड घालावी लागेल. यामुळे परस्पर संबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो. निर्धारित लक्ष्य गाठण्यासाठी कठोर परिश्रम सोडू नका. कठोर परिश्रम केल्यावरच तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळेल. तुम्हाला अनैतिक काम करणे आणि तुमच्या भल्यासाठी कोणाशी तरी कट रचणे टाळावे लागेल, अन्यथा तुम्ही कायदेशीर कारवाईत अडकू शकता. त्याच वेळी, आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
तुमची दिनचर्या चांगली ठेवा, स्वतःला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग आणि ध्यान करा. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, कारण रागाच्या भरात कोणाशीही मतभेद झाल्यास तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. आणि पचण्याजोगे अन्न खा. यासोबतच शरीराला आवश्यक तेवढेच खा, नाहीतर पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. दुसरीकडे, जर तुम्ही गरजूंना मदत करण्यासाठी पुढे राहिलात तर तुम्हाला शनीच्या त्रासातून आराम मिळू शकतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)