Shanidev : शनिवारी या चार गोष्टी दिसणे मानले जाते शुभ, प्राप्त होते शनिदेवाची कृपा
आठवड्यातील प्रत्येक दिवस वेगवेगळ्या देवी-देवतांना समर्पित असतो. शनिवारी शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही शनिवारी या 4 गोष्टी पाहिल्या असतील तर समजून घ्या शनिदेवाची कृपा तुमच्यावर लवकरच होणार आहे. शनिवारी या गोष्टी पाहणे खूप शुभ मानले जाते.
मुंबई : न्यायाची देवता शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी लोक विविध उपाय आणि पूजा करतात. असे म्हटले जाते की, जर शनिदेवाची (Shanidev) कृपादृष्टी एखाद्यावर पडली तर त्या व्यक्तीला यशस्वी आणि श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. दुसरीकडे, जर शनि महाराजांची एखाद्यावर कृपादृष्टी नसेल तर समजून घ्या की ती व्यक्ती शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांशी संघर्ष करत राहील. शनिदेवाला शास्त्रात धर्मराज देखील म्हंटले आहे. ते प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या-वाईट कर्मांची नोंद ठेवतात. अशा परिस्थितीत माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे, तरच शनिदेवाची कृपा त्याच्यावर होऊ शकते.
आठवड्यातील प्रत्येक दिवस वेगवेगळ्या देवी-देवतांना समर्पित असतो. शनिवारी शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही शनिवारी या 4 गोष्टी पाहिल्या असतील तर समजून घ्या शनिदेवाची कृपा तुमच्यावर लवकरच होणार आहे. शनिवारी या गोष्टी पाहणे खूप शुभ मानले जाते.
शनिवारी या गोष्टी पाहाणे मानले जाते शुभ
1. कावळा हे शनिदेवाच्या अनेक वाहनांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला शनिवारी काळा कावळा दिसला तर समजून घ्या की तुम्ही खूप भाग्यवान आहात. कावळा दिसणे म्हणजे शनिदेव तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि तुम्हाला लवकरच एखादी चांगली बातमी मिळू शकते.
2. जर तुम्ही शनिवारी एखादा भिक्षुकी पाहिला असेल किंवा एखाद्या भिक्षुकाने तुमच्याकडे काही मागितले असेल तर त्याला नक्कीच काहीतरी द्या. असे केल्याने शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करू शकतात.
3. शनिवारी काळा कुत्रा दिसणे शुभ चिन्ह आहे. जर तुम्ही देखील काळ्या कुत्र्याला पाहिले असेल तर त्याला तेल लावलेली पोळी नक्कीच खायला द्या. यामुळे केतू दोषापासून मुक्ती मिळतेच शिवाय शनिदेवाची कृपाही मिळते.
4. शनिवारी काळी गाय पाहणे म्हणजे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. शनिवारी काळी गाय दिसणे शुभ लक्षण आहे. गायीला हिरवा चारा खायला द्याला.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)