Shravan 2022: श्रावणाचा दुसरा सोमवार या तीन राशींसाठी असणार फलदायी, महादेवाची होणार कृपा
श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते. अशा स्थितीत एकादशी आणि सोमवारच्या व्रतामुळे या दिवसाचे महत्त्व वाढत आहे. श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी रवि योगही तयार होत आहे.
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार श्रावण महिना खूप विशेष आहे. हा महिना भगवान शिवाला समर्पित आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकराची आराधना केल्याने दुःखापासून मुक्ती मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात. 8 ऑगस्ट रोजी श्रावणाचा दुसरा सोमवार (Shravan Somwar) आहे. या दिवशी पुत्रदा एकादशीचा योग येत आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते. अशा स्थितीत एकादशी आणि सोमवारच्या व्रतामुळे या दिवसाचे महत्त्व वाढत आहे. श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी रवि योगही तयार होत आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये (Astrology) रवि योग शुभ कार्यासाठी खूप चांगला मानला जातो. 08 ऑगस्ट रोजी सकाळी 05:46 ते दुपारी 02:37 पर्यंत रवि योग असेल. ज्योतिषांच्या मते, श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी भगवान शंकराची काही राशींवर विशेष कृपा असेल. चला जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत.
- वृषभ- वृषभ राशीच्या लोकांसाठी श्रावणाचा दुसरा सोमवार खूप खास असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांवर भगवान शंकराची कृपा राहील. या राशीच्या लोकांना दुसऱ्या सोमवारी त्यांच्या सर्व कामात यश मिळेल. एवढेच नाही तर आरोग्याच्या समस्याही संपतील. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी भगवान शंकराची पूजा करणे लाभदायक ठरेल.
- मिथुन- श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या कामात यश मिळेल. शिवाच्या कृपेने तुमची सर्व बिघडलेली कामे होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. चिंता दूर होईल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना फायदा होईल.
- तूळ- तूळ राशीच्या लोकांसाठी श्रावणाचा दुसरा सोमवार शुभ फळ देईल. श्रावणाचा दुसऱ्या सोमवारीही भगवान भोलेनाथांची कृपा तुमच्यावर राहील. नोकरी आणि करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही आधीच नोकरीत असाल तर बढतीची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आत्मविश्वास वाढेल. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी शंकराला जल अर्पण करणे शुभ ठरेल.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)