Shrawan 2023 : पाच हजार वर्ष जुने आहे हे शिव मंदिर, येथे महादेवाने यमराजाला केले होते बंदिस्त
विष्णुसागराच्या काठी चोर्यासी महादेवात 36 वे स्थान असलेले भगवान श्री मार्कंडेश्वर महादेवाचे 5 हजार वर्षे जुने मंदिर आहे. जे सम्राट विक्रमादित्यच्या काळातील मानले जाते.

मुंबई : उज्जैन जेथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले जगप्रसिद्ध श्री महाकालेश्वर मंदिर (Mahakaleshwar Mandir) आहे. महाकालेश्वराच्या दर्शनाने अकाली मृत्यूचे भय नाहीसे होते. येथे दररोज लाखो भाविक बाबा महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनमध्ये येतात. एका आख्यायीकेनुसार या धार्मिक नगरीत भगवान शिवाचे असे चमत्कारिक मंदिर आहे, जिथे भगवान शिव भक्ताचे रक्षण करण्यासाठी प्रकट झाले आणि यमराजाला साखळदंडांनी बांधले. भगवान शिवाच्या या चमत्कारामुळे, वर्षभर भाविक मंदिरात विशेष प्रार्थना करतात आणि दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतात. 18 जुलैपासून श्रावण (Shrawan 2023) महिन्याला सुरूवात होत आहे. या निमीत्त्याने अनेक भावीक येथे दर्शनासाठी जावू शकतात.
मार्कंडेय ऋषींनी येथे मृत्यूवर विजय मिळवला
विष्णुसागराच्या काठी चोर्यासी महादेवात 36 वे स्थान असलेले भगवान श्री मार्कंडेश्वर महादेवाचे 5 हजार वर्षे जुने मंदिर आहे. जे सम्राट विक्रमादित्यच्या काळातील मानले जाते. मंदिराचे पुजारी सांगितlel की, हे तेच मंदिर आहे जिथे ऋषी मार्कंडेय यांनी कालचा पराभव करून मृत्यूवर विजय मिळवला आणि ते येथे चिरंजीवी झाले. पद्मपुराणात उल्लेख आहे की, ब्रह्मदेवाची तपश्चर्या केल्याने ऋषी मृकंद मुनींना पुत्रप्राप्तीचे वरदान मिळाले होते, परंतु त्यांचा मुलगा ऋषी मार्कंडेय हा अल्प आयुशी होता त्यामुळे ऋषी मृकंद या काळजीने व्याकुळ झाले होते.
एके दिवशी मुलाच्या विनंतीवरून हा सर्व प्रकार त्यांनी त्याला सांगीतला यानंतर मार्कंडेयाने दिर्घायु होण्यासाठी आणि चिरंजीवी बनण्याच्या इच्छेने अवंतिका तीर्थ महाकाल वनातील या मंदिरात भगवान शंकराची घोर तपश्चर्या केली. जेव्हा ते 12 वर्षांचे होते आणि यमराज त्यांना घेऊन जाण्यासाठी आले तेव्हा मार्कंडेय ऋषींनी भगवान शंकराची पूजा केली. आणि शिवलींगाला दोन्ही हाताने धरून ठेवले.




महादेवाने यमराजाला मंदिरात साखळदंडांनी बांधले होते
मार्कंडेयाचा प्राण घेण्यासाठी यमराजांनी फेकलेल्या फासामुळे भगवान शिव प्रकट झाले आणि यमराजांना मंदिरात साखळदंडांनी बांधले. यासोबतच मार्कंडेय ऋषींना वरदान दिले होते की आता तू 12 कल्प जगशील. आशीर्वादानंतर ऋषी मार्कंडेय अष्ट चिरंजीवी झाले. मंदिरात वर्षभर अनेक कार्यक्रम होत असले तरी श्रावण महिन्यात मार्कंडेश्वर महादेव मंदिरात मोठ्या प्रमाणात भक्त येतात.
रात्री देवाची विशेष पूजा आणि आरती केली जाते. मंगला आरतीनंतर भक्त दिवसभर परमेश्वराची अभिषेक पूजा करतात. या पूजेनंतर सायंकाळी 4 वाजल्यापासून पुन्हा देवाची पंचामृत अभिषेक पूजा, शृंगार व सायंकाळची आरती सुरू असते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)