मेष राशीत बुध आणि शुक्राची भेट, लक्ष्मी नारायण योगामुळे ‘या’ राशींचं आर्थिक गणित बदलणार

शुभ ग्रह असलेल्या शुक्र आणि बुधाच्या युतीमुळे मेष राशीत लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. या स्थितीमुळे तीन राशींच्या जातकांना विशेष फायदा होणार आहे.

मेष राशीत बुध आणि शुक्राची भेट, लक्ष्मी नारायण योगामुळे 'या' राशींचं आर्थिक गणित बदलणार
लक्ष्मी नारायण योगामुळे या राशींचं नशीब फळफळणार, बुध-शुक्र जोडी देणार पाठबळ
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 3:30 PM

मुंबई : प्रत्येकाचं आयुष्य हे क्षणाक्षणाला बदलत असतं. आज सुखाचे दिवस असतात, तर उद्या दु:खही सहन करावं लागतं. ज्योतिषशास्त्रानुसार दिवस सारखे नसतात कारण ग्रहांची स्थिती वेळोवेळी बदलत असते. त्यात पाप ग्रह आणि शुभ ग्रह अशी विभागणी करण्यात आली आहे. शुभ ग्रहांची युती शुभ फळ देते, अशी मान्यता आहे. पण हे दोन्ही शुभ ग्रह एकमेकांचे मित्र असणं गरजेचं आहे. असाच काहीसा योग मेष राशीत जुळून येणार आहे. मेष राशीत बुध आणि शुक्राची युती होणार आहे. यामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे.

शुक्र 12 मार्च 2023 रोजी मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. तर 16 मार्च रोजी बुध मेष राशीत प्रवेश करेल आणि 31 मार्चपर्यंत ठाण मांडून बसेल. त्यामुळे 16 मार्च ते 31 मार्च हा कालावधीत लक्ष्मी नारायण योग जुळून आला आहे. शुक्र हा धन आणि समृद्धी देणारा ग्रह आहे. तर बुध हा व्यापार आणि बुद्धिमत्ता देणारा ग्रह आहे. त्यामुळे दोन्ही ग्रहांची युती 3 राशींसाठी फलदायी ठरणार आहे.

तीन राशींना होणार फायदा

मिथुन : या राशीच्या लोकांना बुध शुक्र युतीचा फायदा होईल. कारण या राशीच्या अकराव्या स्थानात हा योग तयार होत आहे. या स्थानाला उत्पन्न आणि नफ्याचं स्थान मानलं जातं. ज्या कामात हात घालाल त्या कामात अपेक्षित यश मिळेल. तसेच गुंतवणुकीतून योग्य फायदा दर्शवत आहे. तसेच अचानक धनलाभ होण्याची शक्यताही आहे. कुटुंबातील वातावरणही या काळात आनंदी राहील.

कर्क : या राशीच्या कर्मभावात हा योग तयार होत आहे. त्यामुळे 31 मार्चपर्यंतचा अवधी सुखमय असेल. कामात ठरल्याप्रमाणे अपेक्षित यश मिळेल. तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नोकरीची संधी मिळेल. तसेच व्यवसायिकांना या काळात चांगला नफा होईल, असं ग्रहमान आहे. तसेच गुंतवणुकीकडे आस लावून बसलेल्या जातकांना अपेक्षित यश मिळेल.

सिंह : या जातकांच्या नवव्या स्थानात शुक्र आणि बुधाची युती होणार आहे. त्यामुळे नशिबाची चांगली साथ मिळेल. कोणाकडून पैसे येणार असतील, तर या काळात मिळतील. मात्र या काळात कोणालाही उसने पैसे देण्याच्या भानगडीत पडू नका. गेल्या काही दिवसांपासून बिघडलेलं आर्थिक गणित या काळात सुधारेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत अपेक्षित यश मिळेल. तब्येतची काळजी घ्याल.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.