Shukra Gochar 2023 : अवघ्या काही तासात शुक्र मिथुन राशीत करणार प्रवेश, राशीचक्रावर असा होणार परिणाम
Shukra Gochar : शुक्र हा ग्रहमंडळातील शुभ ग्रह आहे. त्यामुळे गोचर कालावधीत कोणत्या स्थानात बसला आहे. त्यावरून शुभ फळ प्रदान करतो. चला जाणून घेऊयात शुक्र गोचर आणि फळाबाबत
मुंबई : ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सौंदर्य, सुख समृद्धी कारक ग्रह मानलं गेलं आहे. भौतिक सुख शुक्राच्या स्थितीमुळे मिळतं. त्यामुळे शुक्र गोचर खूप महत्त्वाचं ठरतं. शुक्र ग्रह 2 मे रोजी बुधाची स्वामित्त्व असलेल्या मिथुन राशीत प्रवेश करेल. 2 मे रोजी दुपारी 1 वाजून 46 मिनिटांनी मिथुन राशीत गोचर होईल. त्यानंतर शुक्र ग्रह या राशी 30 मे 2023 रोजी संध्याकाळी 7 वाजून 39 मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर चंद्राची स्वामित्व असलेल्या कर्क राशीत प्रवेश करेल. पण शुक्राच्या स्थितीमुळे राशीचक्रावर काय परिणाम होईल जाणून घेऊयात.
शुक्र ग्रहाचा राशीचक्रावर असा परिणाम होणार
मेष : शुक्र गोचर तिसऱ्या स्थानात असल्याने या राशीच्या जातकांसाठी फलदायी ठरणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
वृषभ : या राशीच्या जातकांच्या दुसऱ्या स्थानात शुक्र असणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. बचत झाल्यामुळे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देता येईल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. नोकरीच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल. काही कामं मनासारखी होतील.
मिथुन : या राशीत शुक्र गोचर करून येणार आहेत. त्यामुळे चेहऱ्यावर तेज दिसून येईल. टापटिप राहण्याची सवय आणि शुक्राची एन्ट्री यामुळे फायदा होणार आहे. प्रेम प्रकरणात यश मिळेल. या काळात एखादी चांगली बातमी तुमच्या कानावर पडेल.
कर्क : या राशीच्या बाराव्या म्हणजेच व्यय स्थानात शुक्र असणार आहे. त्यामुळे शुक्राचा विपरीत परिणाम दिसून येईल. त्यामुळे खर्च वाढेल. तसेच आर्थिक स्थिती कमकुवत होतील. वस्तू घ्याल पण जास्तीचे पैसे मोजावे लागतील.
सिंह : या राशीच्या अकराव्या स्थानात शुक्र गोचर करणार आहे. त्यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. पगारवाढ किंवा पदोन्नती होण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणात तुम्हाला अपेक्षित यश या काळात मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहील.
कन्या : या राशीच्या दहाव्या स्थानात शुक्र गोचर करणार आहे. यामुळे भौतिक सुखांचा तुम्हाला अनुभव घेता येईल. नशिबाची चांगली साथ तुम्हाला मिळेल. हात घालाल त्या कामात अपेक्षित यश मिळेल. या काळात तुमचा आत्मविश्वास दुणावलेला राहील.
तूळ : या राशीच्या नवव्या स्थानात शुक्र गोचर करणार आहे. त्यामुळे धनलाभाचा योग जुळून येईल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळेल. अडकलेली कामं या काळात मार्गी लागतील. लांबचा प्रवास या काळात करावा लागू शकतो. समाजात मानसन्मान वाढेल.
वृश्चिक : या राशीच्या आठव्या स्थानात शुक्र गोचर करणार आहे. त्यामुळे प्रेम प्रकरणात काही अडचणी येऊ शकतात. जोडीदारासोबत काही कारणामुळे वाद होऊ शकतो. आर्थिक स्थिती या काळात चांगली राहील. पण मानसिकरित्या तुम्हाला समाधान मिळणार नाही.
धनु : या राशीच्या सातव्या स्थानात शुक्र गोचर करणार आहे. लव्ह लाईफ एकदम मस्त राहील तसेच रोमांसचा योग जुळून येईल. जोडीदारासोबत शॉपिंग वगैरे कराल. तसेच पार्टनरसोबत बाहेर फिरण्याचा योग जुळून येईल. विनाकारण वाद या काळात टाळा.
मकर : या राशीच्या सहाव्या स्थानात शुक्र गोचर करणार आहे. त्यामुळे आरोग्य विषयक तक्रारी वाढू शकते. तुम्हाला चांगलं पोषणयुक्त आहार घ्यावा लागेल. भरपूर पाणी प्या. खर्चावर या काळात नियंत्रण ठेवा. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल.
कुंभ : या राशीच्या पाचव्या स्थानात शुक्र गोचर आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले वाद संपुष्टात येतील. जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतित कराल. या काळात बेरोजगार तरुणांना नोकरी मिळू शकते. प्रयत्नांना अपेक्षित यश मिळाल्याने आनंदी राहाल.
मीन : या राशीच्या चौथ्या स्थानात शुक्र गोचर करणार आहे. त्यामळे वाहन खरेदीचा योग जुळून येईल. भावा बहिणींकडून चांगलं सहकार्य मिळेल. वैवाहित जीवनात तुम्हाला आनंद मिळेल. तसेच मित्र परिवाराकडून चांगली मदत मिळू शकते.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती उपलब्ध स्रोतावर आधारित आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. )