भौतिक सुखांचा कारक शुक्र ग्रह करणार गोचर, 12 फेब्रवारीपर्यंत तीन राशींवर राहील लक्ष्मीची कृपा

ज्योतिषशास्त्रानुसार ज्या व्यक्तीवर शुक्र ग्रहाची कृपा त्याला भौतिक सुखांपासून कोणीही रोखू शकत नाही. असा हा शुक्र ग्रह 18 जानेवारीला गोचर करत आहे. त्यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. तीन राशीच्या जातकांना शुक्राच्या गोचराचा लाभ होईल. 12 फेब्रुवारीपर्यंत सकारात्मक परिणामांची अनुभूती होईल.

भौतिक सुखांचा कारक शुक्र ग्रह करणार गोचर, 12 फेब्रवारीपर्यंत तीन राशींवर राहील लक्ष्मीची कृपा
शुक्राच्या गोचरामुळे राशीचक्रावर सकारात्मक परिणाम, तीन राशींना होणार 12 फेब्रुवारीपर्यंत सर्वाधिक लाभ
Follow us
| Updated on: Jan 06, 2024 | 5:12 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं एक अस्तित्व आहे. त्यामुळे कोणत्याही ग्रहाने गोचर केलं की राशीचक्रात उलथापालथ पाहायला मिळणार आहे. शुक्र ग्रह सध्या वृश्चिक राशीत विराजमान आहे. 18 जानेवारी 2024 रोजी रात्री 8 वाजून 46 मिनिटांनी शुक्र ग्रह धनु राशीत प्रवेश करेल. धनु ही गुरुची स्वामित्व असलेली रास आहे.या राशीत 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत राहणार आहे. 25 दिवस राशीचक्रातील तीन राशींना चांगली अनुभूती मिळणार आहे. भौतिक सुखांसाठी सुरु असलेली धडपड संपुष्टात येईल असं ग्रहमान आहे. साधरणत: ग्रह द्वितीया, एकादश, दशम आणि नवम स्थानात चांगली फळं देतो. त्यामुळे कोणत्या राशींना 25 दिवसांचा लाभ मिळणार याबाबत जाणून घेऊयात. कोणत्या तीन राशी लकी आहेत ते समजून घेऊयात..

या तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ

वृश्चिक : या राशीतून धनु राशीत प्रवेश करताच द्वितीय स्थानात शुक्र असेल. या स्थानात धन, डोळे, मुख, वाणी, परिवार यांचं आकलन केलं जातं. शुक्राचा प्रभाव या सर्वांवर दिसून येईल. खासकरून धनस्थान असल्याने सकारात्मक परिणाम दिसतील. आर्थिक अडचणी दूर होतील. तसेच कोणताही तगदा न लावता अडकलेले पैसे परत मिळतील. एकंदरीत या कालावधीत ढासळलेली आर्थिक स्थिती सुधारण्याची सर्वाधिक शक्यता आहे.

कुंभ : या राशीच्या एकादश भावात शुक्र गोचर करणार आहे. 25 दिवस उत्पन्न आणि लाभ स्थानात शुक्र राहणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना उत्पन्नात वाढ झालेली दिसून येईल. खासकरून व्यवसाय करणाऱ्या जातकांना याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. कारण नोकरदारांच्या तुलनेत धंदा करणाऱ्यांची रोजची उलाढाल होत असते. तसेच नवे करार या काळात निश्चित होऊ शकतात.

मीन : या राशीच्या दशम स्थानात शुक्र 25 दिवस ठाण मांडून असणार आहे. हे स्थान करिअर आणि व्यवसायाशी निगडीत आहे. करिअर म्हंटलं की नोकरदार वर्गाचा यातून विचार केला जातो. नोकरी करणाऱ्या जातकांना काही चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. सध्या हाती मिळत असलेल्या पगारापेक्षा 10 ते 20 टक्के पगारवाढ नवीन ठिकाणी मिळू शकते. तसेच चांगली पोस्ट मिळाल्याने करिअरचा आलेख उंचावलेला राहील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.