Shukra Gochar: 15 फेब्रुवारीपासून तीन राशींना शुक्र देणार साथ, कशी असेल स्थिती वाचा

Shukra Grah Gochar 2023: राशीमंडळात ग्रहांचं गोचर सुरुच असतं. कधी या राशीत तर कधी त्या राशीत असं भ्रमण सुरु असतं. या गोचरामुळे मानवी जीवनावर परिणाम दिसत असतो. आता प्रसिद्धीकारक शुक्र ग्रह 15 फेब्रुवारीला गोचर करणार आहे.

Shukra Gochar: 15 फेब्रुवारीपासून तीन राशींना शुक्र देणार साथ, कशी असेल स्थिती वाचा
प्रसिद्धीकारक शुक्र ग्रह करणार गोचर, तीन राशींना मिळणार नशिबाची साथ
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 9:10 PM

मुंबई: ज्योतिषशास्त्रात शनि (Shani), गुरु (Guru) आणि बुध (Budh) या महत्त्वांच्या ग्रहांसह शुक्राकडेही नजर लागून असते. कारण शुक्र (Shukra) हा ग्रह प्रसिद्धीचा कारक ग्रह आहे. चंद्र आणि बुधानंतर शुक्र हा सर्वात वेगाने राशी बदलणारा ग्रह आहे. 15 फेब्रुवारी 2023 रोजी शुक्र ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत गुरु ग्रह वर्षाभरासाठी ठाण मांडून आहे. तर शुक्र ग्रह 12 मार्चपर्यंत असणार आहे. त्यामुळे गुरु शुक्र युती होणार आहे. तर गुरु ग्रह हा धर्म, ज्ञान आणि अध्यात्म्याशी निगडीत ग्रह आहे. गुरु शुक्राच्या युतीमुळे मीन राशीत मालव्य राजयोग तयार होत आहे. मालव्य राजयोग हा अत्यंत शुभ योग मानला जातो. या योगामुळे अडकलेली कामं पूर्ण होतात. तसेच ज्या कामात हात घालू ते काम पूर्णत्वास येतं.या मालव्य राजयोगाचा फायदा तीन राशींना होणार आहे. 15 फेब्रुवारी ते 12 मार्च 2023 असा 26 दिवस या योगाचा लाभ मिळणार आहे.

मिथुन (Mithun)- या राशीच्या जातकांना शुक्र गोचराचा सर्वाधिक फायदा होणार आहे. शुक्र ग्रहामुळे प्रॉपर्टी खरेदीचा योग जुळून येणार आहे.त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामंही मार्गी लागतील. विदेश यात्रा, घरात लक्झरी वस्तू घेण्याचा योग आहे.व्यवसायिकांना या काळात मोठा लाभ दर्शवत आहे. तसेच लाभदायी करारही निश्चित होऊ शकतात. कौटुंबिक जीवनात आनंदाचं वातावरण असेल. तसेच जोडीदाराकडून चांगली साथ मिळेल.

धनु (Dhanu)- या राशीच्या जातकांची नुकतीच साडेसातीतून सुटका झाली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून त्रासात असलेल्या धनु राशीच्या जातकांना शुक्र-गुरु युतीचा फायदा होणार आहे. मालव्य राजयोगामुळे जातकांना खूशखबर मिळेल. कामाच्या ठिकाणी कौतुकाचा वर्षाव या काळात होईल. तसेच पदोन्नती आणि पगार वाढीची शक्यता दाट आहे. व्यवसायिकांना व्यापार वाढीसाठी हा काळ अनुकूल आहे. जोडीदारासोबत बाहेरगावी फिरण्याचा योग असून कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

मीन (Meen)- या राशीचा स्वामी गुरु असून या राशीत दोन ग्रहांची युती होत आहे. साडेसातीचा पहिला टप्पा असला तरी काही काळ दिलासा मिळणार आहे. शुक्राच्या आगमनाने नोकरीत बढतीची शक्यता आहे. तसेच समाजात मानसन्मान देखील वाढणार आहे. विदेश यात्रा करण्याचा योग जुळून येईल. त्याचबरोबर व्यवसायासाठी मोठी गुंतवणूक मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरी करण्यासाठी या काळात चांगली संधी मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....