दहा वर्षानंतर तीन राशींच्या गोचर कुंडलीत ‘महाधन योग’, पाहा तुमची रास यात आहे का?
बारा राशी, 27 नक्षत्र आणि नवग्रह यांच्या गणितात ज्योतिषशास्त्र चालतं. एप्रिल महिन्यात बऱ्याच ग्रहांची उलथापालथ होत आहे. त्यामुळे काही शुभ योग तयार होत आहेत.
मुंबई – ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी बदल करत असतो. त्यामुळे शुभ अशुभ योगाची स्थिती तयार होते. शुभ ग्रह आणि पाप ग्रह असं वर्गीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे शुभ आणि पाप ग्रहांची युती झाली की त्याची त्यानुसार फळ मिळतात. त्याचबरोबर काही ग्रहांचं एकमेकांशी पटत नाही, त्यामुळे विपरीत परिणाम होतात. आता शुक्र ग्रहाने स्वत:च्या वृषभ राशीत प्रवेश केला आहे.त्यामुळे दहा वर्षानंतर महाधन योग तयार झाला आहे. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात तीन राशींच्या जातकांबाबत
मकर – या राशीच्या जातकांना उतरती साडेसाती सुरु आहे. त्यात शनिदेव धनभावात स्थित आहेत. आता शुक्राची साथ मिळाल्याने चांगले दिवस सुरु होतील. गोचर कुंडलीत भाग्य स्वामी ग्रह बुध असून शुक्र ग्रह या स्थानात विराजमान झाले आहेत. त्यामुळे या राशीच्या जातकांना निश्चित या स्थितीचा फायदा होईल. तुम्हाला येत्या काही दिवसात आर्थिक सुधारणा पाहायला मिळेल. व्यवसायात मोठे करार निश्चित होऊ शकतात. तसेच कौटुंबिक वातावरणही या काळात चांगलं राहील.
कन्या – या राशीच्या नवव्या स्थानात शुक्र देवांचं भ्रमण सुरु आहे. नववं स्थान उत्पन्नाशी निगडीत स्थान आहे. त्यात शुक्र देव धनाचे स्वामी आहे. त्यामुळे महाधन योग तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे. तुम्हाला अचानकपणे धनप्राप्ती होऊ शकते. तसेच थोड्याच प्रयत्नात मोठं यश हाती लागू शकतं. जे लोक फिल्म, मीडिया, संगीत आणि कला क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांना फायदा होऊ शकतो. विदेशवारी घडण्याची शक्यता आहे.
वृषभ – या राशीतच शुक्र देवांनी गोचर केलं आहे. महाधन योग वृषभ राशीच्या जातकांना फायदा होईल. शुक्र ग्रह लग्न राशीत गोचर करून येतो तेव्हा शश, मालव्य आणि लक्ष्मी योग तयार होतो. त्यामुळे या राशीच्या जातकांना शुक्राची साथ मिळणार आहे. त्यामुळे हात टाकाल त्या कामात यश अशी स्थिती आहे. जोडीदाराची उत्तम साथ तुम्हाला मिळेल. पार्टनरशिपच्या धंद्यात यश मिळू शकते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)