Shukra Gochar : मे महिन्याच्या सुरुवातीला धनदाता शुक्र करणार गोचर, या राशींना मिळणार जबरदस्त साथ

Shukra Gochar : वैभवदाता शुक्र ग्रहण मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरामुळ मेष, वृषभसह चार राशींना फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात शुक्र गोचर आणि त्याचा कालावधी

Shukra Gochar : मे महिन्याच्या सुरुवातीला धनदाता शुक्र करणार गोचर, या राशींना मिळणार जबरदस्त साथ
शुक्राच्या गोचरामुळे राशीचक्रातील 4 राशींना होणार फायदा, आर्थिक स्त्रोताचे नवीन मार्ग होतील खुले
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 3:27 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात चंद्र आणि बुध ग्रहानंतर शुक्र ग्रह राशी बदल करतो. शुक्र हा एक शुभ ग्रह असून कुंडलीत शुभ स्थितीत असेल शारीरिक, भौतिक आणि वैवाहिक सुख मिळतं. शुक्र ग्रह प्रणय, मानसन्मान, कला, प्रतिभा आणि सौंदर्याचा कारक ग्रह आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्र शुक्राची स्थितीही पाहतात. सध्या शुक्र वृषभ राशीत आहे. त्यानंतर 2 मे 2023 रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरानंतर राशी चक्रातील 12 राशींवर परिणाम दिसून येईल. काही राशीच्या जातकांना त्याचा लाभ मिळेल.

पंचांगानुसार, शुक्र ग्रह 2 मे 2023 रोजी दुपारी 1 वाजून 36 मिनिटांनी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. या राशीत शुक्र ग्रह 30 मे 2023 रोजी संध्याकाळी 7 वाजून 39 मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर चंद्राचं स्वामित्व असलेल्या कर्क राशीत प्रवेश करेल. शुक्र ग्रह एका राशीत जवळपास 23 दिवस राहतो आणि त्यानंतर गोचर करतो.

शुक्र गोचरामुळे या राशीच्या जातकांना होईल फायदा

मेष : मिथुन राशीत प्रवेश केल्यानंतर या राशीच्या तिसऱ्या स्थानात शुक्राचा प्रभाव दिसेल. यामुळे मित्र आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. प्रेम प्रकरणात तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. पण खर्च करताना जरा काळजी घ्या अन्यथा भविष्यात फटका बसू शकतो. व्यवसायाच्या दृष्टीने तुम्हाला लाभ मिळेल.

वृषभ : सध्या शुक्र ग्रह या राशीच्या लग्न भावात आहे. मिथुन राशीत प्रवेश करताच धन म्हणजेच दुसऱ्या स्थानावर नजर असेल. त्यामुळे सुख समृद्धी, धन संपदेचा योग जुळून येईल. कौटुंबिक वातावरणही आनंदी राहील. कुटुंबातील दीर्घ काळापासून सुरु असलेला वाद संपुष्टात येईल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो.

मिथुन : या राशीच्या लग्न भावात म्हणजेच शुक्र या राशीतच ठाण मांडणार आहेत. त्यामुळे या राशीच्या जातकांना निश्चितच फायदा होईल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. नोकरी बदलण्यासाठी हा काळ उत्तम राहील. संतानप्राप्तीचा योगही जुळून येईल.

सिंह : या राशीच्या एकादश भावात शुक्र गोचर करणार आहे. या स्थानाला उत्पन्नाचं स्थान संबोधलं जातं. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील. पदोन्नती किंवा पगारवाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. त्यामुळे आत्मविश्वास दुणावेल. किचकट कामही चुटकीसरशी पूर्ण कराल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.