शुक्र ग्रह मीन राशीत 25 दिवस मांडणार ठाण, गोचरामुळे 12 राशींवर होणार असा परिणाम

धन आणि वैभव कारक शुक्र ग्रह आता राशीबदल करणार आहे. शुक्र ग्रह कुंभ राशीतून मीन राशीत आल्याने 12 राशींवर सकारात्मक फरक दिसणार आहे. या काळ काही राशींसाठी सुखकारक ठरणार आहे.

शुक्र ग्रह मीन राशीत 25 दिवस मांडणार ठाण, गोचरामुळे 12 राशींवर होणार असा परिणाम
शुक्राच्या गोचरामुळे राशीचक्रावर पडणार असा फरक, 25 दिवस कसे असतील जाणून घ्या
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 2:30 PM

मुंबई : ग्रहांचं गोचर आणि त्यावरून पृथ्वीतलावर घडणारे बदल आता नित्याचेच झाले आहेत. इतकंच काय तर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. ग्रहमंडळात शुभ ग्रह आणि पाप ग्रह अशी दोन विभागात मांडणी केली आहे. एखादा शुभ ग्रह जेव्हा राशी बदल करतो तेव्हा सकारात्मक परिणाम दिसून येतात.ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा असाच एक ग्रह आहे. या ग्रहाला भाग्योदयाचा स्वामी गणलं गेलं आहे. शुक्र ग्रह मीन राशीत 25 दिवस असणार आहे. त्यानंतर 12 मार्चला मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. पण मीन राशीतील शुक्र 12 राशींवर सकारात्मक प्रभाव पाडणार आहे. कारण या राशीत गुरु ग्रह असल्याने गुरु-शुक्र युती होणार आहे. शुक्र ग्रहाला धन आणि वैभव कारक ग्रह मानलं गेलं आहे.

मेष – शुक्र ग्रहाचं गोचर मेष राशीच्या 12 व्या घरात आहे. त्यामुळे मेष राशीच्या जीवनात सुख समृद्धी वाढेल. पण त्याचबरोबर खर्चही पाण्यासारखा होईल. त्यामुळे हातात असलेला पैसा योग्य पद्धतीने वापरा.

वृषभ – या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या अकराव्या स्थानात शुक्र गोचर आहे. त्यामुळे या राशीला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच प्रगतीच्या अनेक संधी चालून येतील. पण यावेळी कोणताही अहंकार बाळगू नका.

मिथुन – या राशीचा स्वामी बुध ग्रह असून या राशीच्या दहाव्या स्थानात शुक्र गोचर आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी चांगली साथ मिळेल. समाजात मान सन्मान वाढेल.वेळ अनुकूल असून या राशीच्या लोकांना फायदा होईल.

कर्क – शुक्र ग्रह या राशीच्या नवव्या स्थानात गोचर आहे. हे स्थान भाग्याशी निगडीत आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या जातकांच्या वेतनात वृद्धी होईल. तसेच व्यवसायिकांनाही धनलाभ होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना अचानक लाभ होईल.

सिंह – शुक्र गोचर या राशीच्या आठव्या स्थानात होणार आहे. हे गोचर सिंह राशीसाठी अनुकूल सिद्ध होणार आहे. अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम या काळात दिसून येतील. गुंतवणुकीतून चांगलं उत्पन्न मिळू शकते.पण आरोग्याची काळजी घ्याल.

कन्या – या राशीच्या सातव्या स्थानात शुक्र गोचर आहे.हे स्थान विवाह आणि जोडीदाराशी संबंधित आहे. जुन्या अडचणीतून या काळात मार्ग सापडू शकतो. भागीदारीच्या धंद्यात चांगलं यश मिळेल. या काळात आरोग्य उत्तम राहील.

तूळ – या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्यामुळे पुढचे 25 दिवस खर्चावर नियंत्रण ठेवा.आरोग्याची काळजी घ्याल. त्याचबरोबर न्यायालयीन प्रकरणातून दूर राहा. भांडणामुळे नुकसान होऊ शकतं.

वृश्चिक – या राशीच्या पाचव्या स्थानात शुक्र गोचर आहे. व्यवसायाच्या नव्या संधी प्राप्त होतील. नोकरी करणाऱ्या जातकांनाही हा काळ सुखाचा जाईल. डोक्यावरील भार अचानक कमी झाल्याचं वाटेल.

धनु – या राशाच्या चौथ्या स्थानात शुक्र गोचर होणार आहे. त्यामुळे जमिनजुमल्याशी निगडीत व्यवहार जपून करा.निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबाचा सल्ला घ्या.

मकर – या राशीसाठी शुक्र गोचर लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या तिसऱ्या स्थानात शुक्राचं स्थान असणार आहे. त्यामुळे आपली हिम्मत या काळात दिसून येईल. हा काळ आर्थिक मार्ग मोकळे करणारा असेल.

कुंभ – या राशीच्या दुसऱ्या स्थानात शुक्र गोचर करणार आहे. या स्थानाला धनस्थान असं संबोधलं जातं. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच परदेश प्रवासाचा योग जुळून येईल.

मीन – या राशीतच शुक्र ग्रह गोचर आहे. म्हणजेच पहिल्या स्थानात शुक्र 25 दिवसांसाठी आहे. त्यामुळे अचानकर बरेच सकारात्मक बदल दिसून येतील.तुमच्या बोलण्याने लोकं आकर्षित होतील. वैवाहिक जीवनही सुखकर असेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.