शुक्र ग्रहाचं आपल्या प्रिय राशीत महिनाभरासाठी ठाण, तीन राशींच्या लोकांना होणार फायदा

नवग्रहांमध्ये बुधानंतर शुक्र हा हा सूर्याजवळचा ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. हस्तरेखा शास्त्रात तळहाताच्या अंगठ्याच्या शेजारील उंचवटा शुक्राचा असतो.

शुक्र ग्रहाचं आपल्या प्रिय राशीत महिनाभरासाठी ठाण, तीन राशींच्या लोकांना होणार फायदा
शुक्र ग्रहाचं स्वराशीत गोचरामुळे तीन राशींचं नशिब पालटणार, पैशांची चणचण होणार दूर
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 12:05 PM

मुंबई – ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा शुभ ग्रह म्हणून गणला जातो. या ग्रहाची साथ असेल तर धन, संपत्ती आणि भौतिक सुख मिळतं. त्यामुळे शुक्राची स्थिती कुंडलीत चांगली असलेल्या जातकांना चांगलं आयुष्य उपभोगायला मिळतं. त्यामुळे शुक्राची कुंडलीतील स्थिती आणि गोचर कालावधीकडे ज्योतिष बारकाईने बघतात. शुक्र ग्रहाने 6 एप्रिल 2023 रोजी आपली स्वरास असलेल्या वृषभ राशीत प्रवेश केला आहे. या राशीत शुक्र महिनाभर असणार आहे. त्यामुळे 12 राशींवर या गोचराचा परिणाम दिसून येईल. तीन राशींना या गोचराचा फायदा होईल.

वृषभ – या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. या राशीत शुक्राने गोचर केलं आहे. त्यामुळे व्यक्तिमत्त्वात फरक दिसून येईल. या काळात जोडीदारासोबत एखादा बिझनेस सुरु करू शकता. बाहेरगावी फिरायला जाण्याचा योग जुळून येईल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. नोकरीच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. जोडीदारासोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील.

कर्क – या राशीच्या उत्पन्न भावात शुक्राचं गोचर आहे. त्यामुळे शुक्राची चांगली साथ या राशीच्या जातकांना मिळणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. व्यवसायिकांसाठी हा काळ उत्तम असेल. काही करार या काळात निश्चित होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. शेअर बाजार, लॉटरी या माध्यमातून अचानक धनलाभ होऊ शकतो. न्यायालयीन प्रकरणातही यश मिळेल.

तूळ – शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन अष्टम स्थानात होणार आहे. या काळात करिअर आणि नोकरीत चांगलं यश मिळताना दिसेल. नवा बिझनेस सुरु करण्यासाठी हा काळ उत्तम असेल. कौटुंबिक वातावरण या काळात चांगलं राहील. पती पत्नीमध्ये संवाद वाढेल. जे जातक फिल्म लाइन, मीडिया, कला आणि संगीताशी निगडीत आहेत त्यांना शुक्राचं बळ मिळेल. त्याचबरोबर अडकलेली कामं मार्गी लागतील.

कमकुवत शुक्र मजबूत करण्याचे ज्योतिषीय उपाय

  • ज्या जातकांच्या कुंडलीत शुक्र ग्रह कमकुवत त्यांनी प्रत्येक शुक्रवारी आणि पौर्णिमेला “ऊं द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः” या मंत्राचा जप करावा.
  • शुक्रवारी मुंग्यांना पीठात साखर मिश्रित करून द्या. त्यामुळे आर्थिक लाभ होईल.
  • शुक्रवारी भगवान शिवांना पांढरं फुल अर्पण करा.
  • शुक्रवारी जेवणात साखर, तांदूळ, दूध, दही आणि तुपाचा वापर करावा.
  • पाण्यात वेलची टाकून स्नान करा. यामुळे शुक्र ग्रह मजबूत होण्यास मदत होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.