होळीनंतर राहु आणि शुक्र ग्रहाची होणार युती, 25 दिवस चार राशींची डोकेदुखी वाढणार

मेष राशीत राहु आणि शुक्र यांची युती होणार आहे. यामुळे अशुभ परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे या दिवसात रोज ओम शुं शुक्राय नम: या मंत्राचा जप करावा. तसेच शुक्रवारी नियमित उपवास करावा. तसेच शुक्रवारी पांढऱ्या रंगांचे वस्त्र परिधान करावेत.

होळीनंतर राहु आणि शुक्र ग्रहाची होणार युती, 25 दिवस चार राशींची डोकेदुखी वाढणार
राहुसोबत युतीमुळे शुक्र होणार दुषित, 25 दिवस चार राशींचं गणित बिघडणार
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 10:04 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात काही ग्रहांना शुभ, तर काही ग्रहांना पापग्रहाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे शुभ आणि अशुभ ग्रहांच्या युतीमुळे थोड्या अधिक प्रमाणात वाईट परिणाम भोगावे लागतात. म्हणजे वाईट संगतीत चांगले ग्रहही वाईट फळं देतातं असंच ज्योतिष्याचं म्हणणं आहे. शुक्र हा भौतिक सुख, कला आणि सौंदर्यकारक ग्रह आहे. शुक्राची स्थिती कुंडलीत चांगली असली की चांगली फळं मिळतात. पण राहु, केतु आणि मंगळ या सारख्या पापग्रहांसोबत युती झाली तर शुभ ग्रह तशीच फळं देतात. शुक्र ग्रह मेष राशीत 12 मार्चला प्रवेश करणार आहे. त्यामुळे मेष राशीत राहु आणि शुक्र यांची युती होणार आहे. ही युती 6 एप्रिल 2023 पर्यंत असणार आहे. या दिवसात रोज ओम शुं शुक्राय नम: या मंत्राचा जप करावा. तसेच शुक्रवारी नियमित उपवास करावा. तसेच शुक्रवारी पांढऱ्या रंगांचे वस्त्र परिधान करावेत. चला जाणून घेऊयात या युतीमुळे कोणत्या राशींचं नुकसान होईल.

मेष : शुक्र आणि राहुच्या युती या राशीच्या लग्न भावात होणार आहे. त्यामुळे जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे एखाद्या व्यक्तीसोबत जवळचे संबंध निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो. दुसरीकडे तरुणांना प्रेमात विरह सहन करावा लागू शकतो. प्रेमाच्या बाबतीत काही घडामोडी या काळात घडतील. कौटुंबिक वाद टाळण्यासाठी या काळात वाणीवर ताबा ठेवा.

वृषभ : राहु शुक्राच्या युतीमुळे जीवनात अडचणी निर्माण होतील.त्यामुळे 25 दिवस जरा जपूनच राहावं. जुने संबंध आपल्या वादाचं कारण ठरू शकतं. प्रेम जीवनात सावधपणे आपली पावलं उचला. यावेळी आपल्या वागण्यावर नियंत्रण ठेवा. तसेच वाद होईल असं अजिबात बोलू नका. कारण यामुळे जोडीदाराचं मन दुखू शकतं.

कन्या : शुक्र राहुच्या युतीमुळे राशीला 25 दिवस नाहक त्रास सहन करावा लागेल. या काळात तुमचं वागणं थोडं बदलेलं दिसेल. व्यवहारात तुम्हाला फटका बसू शकतो. त्यामुळे कोणताही व्यवहार काळजीपूर्वक कराल. तसेच या काळात अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वाहन काळजीपूर्वक चालवा. आपल्या जोडीदाराला प्राथमिकता द्या. तसेच कोणतंही चुकीचा निर्णय घेऊ नका.

मीन : शुक्र आणि राहुच्या युतीमुळे मीन राशीला परिणाम भोगावे लागतील. त्यात शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा त्यामुळे जास्तच त्रास होईल. वैवाहिक जीवनात अडचण येऊ शकते. कुटुंबाकडून कोणतंही सहकार्य मिळणार नाही. पती आणि पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. तसेच विनाकारण कौटंबिक वाद होण्याची दाट शक्यता आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.