Shukra Gochar : 2024 वर्ष सुरु होण्यापूर्वी शुक्र करणार स्वराशीत प्रवेश, या राशींचं नशिब चमकणार
ज्योतिषशास्त्रात शुक्राच्या गोचराकडे लक्ष लागून असतं. कारण शुक्राला भौतिक सुखांचा कारक मानलं जातं. त्यामुळे 2024 पूर्वी शुक्र ग्रहाचं गोचर तीन राशीच्या जातकांसाठी फलदायी ठरणार आहे. चला जाणून घेऊयात शुक्र गोचर कालावधी कोणत्या राशींना फायदा होणार ते...
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहांची स्थिती राशीचक्रावर परिणाम करत असते. ग्रहांची वर्गवारी पापग्रह आणि शुभ ग्रह अशी करण्यात आली आहे. त्यामुळे कोणता ग्रह कसा गोचर करतो यावर सर्व काही अवलंबून असतं. शुक्र ग्रहाला भौतिक सुखांचा कारक मानला जातो. त्यामुळे शुक्र ग्रहाची स्थिती खूपच महत्त्वाची मानली जाते. शुक्र 30 नोव्हेंबरला स्वरास असलेल्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे शुक्र ग्रहांचं बळ दुपटीने वाढेल. तसेच त्याचा प्रभाव राशीचक्रातील इतर राशींवर दिसून येईल. कारण स्वामी ग्रह स्वराशीत आला की शुभ फळं प्रदान करतो. शुक्र ग्रहाच्या गोचरानंतर राशीचक्रातील तीन राशींना लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना लाभ मिळणार ते…
तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ
तूळ : शुक्र ग्रह याच राशीत प्रवेश करणार आहे. पहिलं स्थान वैयक्तिक स्वभावाला चालना देते. तसेच आत्मविश्वास दुणावलेला दिसून येतो. व्यक्तिमत्व अधिक आकर्षक होईल. तसेच आर्थिक स्थिती या कालावधीत सुधारेल. व्यवसायिकांना या कालावधीत जबरदस्त फायदा होईल. वैवाहित जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. मीडिया, चित्रपट क्षेत्राशी निगडीत लोकांना लाभ मिळेल.
मिथुन : शुक्र या राशीच्या पंचम स्थानात गोचर करणार आहे. व्यापारी वर्गात आनंदाचं वातावरण राहील. गेल्या काही दिवसांपासून पैशांची बचत करणं कठीण झालं होतं. पण या कालावधीत हातात पैसा शिल्लक राहील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्य विषयक तक्रारी दूर होतील. कौटुंबिक पातळीवर आनंदाचं वातावरण राहील.
मकर : या राशीच्या करिअर आणि व्यवसायाच्या स्थानात शुक्र गोचर करणार आहे. त्यात शनि आणि शुक्र यांच्यात मैत्रिपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे या कालावधीत बऱ्याच संधी चालून येतील. आयात निर्यातीचा व्यवसाय करणाऱ्यांना लाभ होईल. भौतिक सुखांची अनुभूती या कालावधीत घेता येईल. प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीचा योग जुळून येईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)