Shwapna Shastra : स्वप्नात पाणी दिसण्याचा होतो असा अर्थ, जीवनात घडणार असतात या गोष्टी
Swapna shastra स्वप्नांद्वारे, कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनात येणारा काळ कसा असेल, कोणत्या प्रकारच्या घटनांबद्दल जागरुक राहावे आणि कोणत्या गोष्टींमुळे जीवन आनंदाने भरून जाईल हे जाणून घेता येते.
मुंबई : स्वप्नशास्त्रामध्ये (Swapna Shastra) सर्व स्वप्नांच्या शुभ-अशुभ परिणामांचा अर्थ सविस्तरपणे सांगितला आहे. स्वप्नांचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. काही लोकं स्वप्नातील लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. स्वप्नांचा प्रभाव लगेच किंवा काही दिवसांनी दिसून येतो. कधी कधी आपण ही स्वप्ने विसरतो तर कधी स्वप्न पूर्ण आठवतात. स्वप्नांद्वारे, कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनात येणारा काळ कसा असेल, कोणत्या प्रकारच्या घटनांबद्दल जागरुक राहावे आणि कोणत्या गोष्टींमुळे जीवन आनंदाने भरून जाईल हे जाणून घेता येते. स्वप्नविज्ञानाचे तज्ज्ञ स्वप्नांच्या आधारे त्यांचे भविष्य वर्तवतात. तुमच्या स्वप्नात पाणी पाहणे तुमच्यासाठी काय सूचित करते याबद्दल जाणून घेवूया.
स्वप्नात पाणी पाहण्याचा असा होतो अर्थ
वाहते पाणी पाहणे – जर तुम्हाला स्वप्नात वाहते पाणी दिसले तर याचा अर्थ तुमच्या जीवनात चढ-उतार येणार आहेत. अडचणी येतील पण फार काळ टिकणार नाहीत. वाहत्या पाण्याचे लक्षण हे देखील आहे की विनाकारण कोणाशीही वाद घालू नका.
पाण्यात काहीतरी तरंगताना पाहणे – हे स्वप्न तुम्हाला एक चांगले संकेत देते. याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनात सुरू असलेल्या सर्व त्रासांना संपवण्याची वेळ आली आहे.
शांत आणि खोल नदी पाहणे – हे स्वप्न आपल्याला एक शुभ संकेत देते. जीवनात शांतता राहील आणि तुम्ही तुमच्या प्रगतीच्या योजना आखाल.
स्वच्छ पाणी दिसणे- स्वच्छ पाणी पाहणे हे खूप शुभ लक्षण आहे. समाजात मान-सन्मान मिळेल, काही सत्कार समारंभात बोलावणे येईल. नोकरी आणि व्यवसायात भरपूर फायदा होईल.
खड्डा किंवा खड्ड्यात पाणी दिसणे – स्वप्नात खोल खड्डा किंवा खड्ड्यात पाणी पाहणे म्हणजे तुम्हाला जिथे आशा नाही तिथून पैसे मिळू शकतात. येत्या काळात लक्ष्मी हातात येईल.
घाणेरडे पाणी पाहणे – स्वप्नात घाण पाणी पाहणे अशुभ असते. हे स्वप्न जीवनात येणाऱ्या संकटांना सूचित करते. जर तुम्ही काही शुभ कार्य करणार असाल किंवा प्रवासाला जात असाल तर ते काही काळासाठी पुढे ढकला.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)