Solar Eclipse 2023 : वर्षाच्या पहिल्या सूर्य ग्रहणाचा या राशींच्या लोकांना होणार सर्वाधीक, तुमची रास यात आहे का?
जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एका सरळ रेषेत असतात तेव्हा खग्रास सूर्यग्रहण होते, ज्यामुळे पृथ्वीच्या एका भागावर पूर्णपणे अंधार पडतो. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो तेव्हा ही स्थिती उद्भवते.
मुंबई : 2023 मध्ये एकूण 4 ग्रहण होणार आहेत, त्यापैकी दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण असतील. या वर्षातील पहिले सूर्यग्रहण खग्रास सूर्यग्रहण (Solar Eclipse 2023) असेल, जे ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून खूप खास मानले जाते. हे सूर्यग्रहण पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये होणार आहे. ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल आणि काही राशींना शुभ परिणाम मिळतील. चला जाणून घेऊया वर्षातील पहिले सूर्यग्रहण कधी होणार आहे आणि या दरम्यान कोणत्या राशींना फायदा होईल.
वर्षातील पहिले सूर्यग्रहण
2023 मधील पहिले सूर्यग्रहण गुरुवार, 20 एप्रिल रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी सकाळी 7.4 वाजता सुरू होईल आणि दुपारी 12.29 पर्यंत चालेल. मात्र, हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतात सुतक कालावधीही लागणार नाही.
या राशींवर सूर्यग्रहणाचा शुभ प्रभाव पडेल
वृषभ
वर्षातील पहिले सूर्यग्रहण वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. या काळात तुम्हाला तुमच्या आयुष्यात नवीन गोष्टी करण्याची संधी मिळेल. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. नोकरदारांना बदल करण्याची संधी मिळेल. कौटुंबिक आणि शारीरिक सुख वाढण्याची उत्तम शक्यता आहे.
मिथुन
पहिले सूर्यग्रहण मिथुन राशीसाठी आनंदाचा वर्षाव करेल. या काळात तुमचा मान-सन्मान वाढेल, यासोबतच तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळू शकते.ज्या लोकांना कोर्ट केसेसमध्ये खूप दिवसांपासून त्रास होत आहे त्यांना विजय मिळेल.
धनु
वर्षातील पहिले सूर्यग्रहण धनु राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. या काळात तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि नोकरीत बढतीच्या संधी मिळतील. यासोबतच तुम्हाला कौटुंबिक आणि वैवाहिक सुख मिळेल. धनु राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)