Solar Eclipse 2023 : 30 दिवसानंतर लागणार वर्षातले पहिले सूर्य ग्रहण, कोणत्या राशींना देणार शुभ परिणाम?
दरवर्षी होणार्या ग्रहणांचा प्रभाव सर्व 12 राशींच्या जातकांच्या जीवनावर दिसून येतो. यंदा 2023 मध्ये एकूण 4 ग्रहण होतील. यापैकी 2 सूर्यग्रहण (Surya Grahan 2023) आणि 2 चंद्रग्रहणांचा समावेश आहे.
मुंबई, हिंदू धर्मात सूर्यग्रहण (Solar Eclipse 2023) आणि चंद्रग्रहणा विशेष महत्व आहे. या दिवसाचे धार्मिक महत्त्व खूप आहे. जोतीषशास्त्राच्या दृष्टीने पण याला महत्वाचे मानल्या जाते. खगोलप्रेमी तर वर्षभर सूर्य आणि चंद्रग्रहणाची वाट पाहत असतात. या वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाबद्दल (Surya Grahan 2023) बोलायचे झाले तर ते पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत या ग्रहणाचा शुभ आणि अशुभ प्रभाव कोणत्या राशीवर होईल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या शिवाय सुतक कालावधी किती काळ चालेल हे देखील जाणून घेऊया.
ग्रहण काळ
पहिले ग्रहण 20 एप्रिल रोजी होणार आहे. पहिले सूर्यग्रहण अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात अडचणी वाढवेल. हे ग्रहण सकाळी 07.04 वाजता होईल आणि दुपारी 12.09 पर्यंत राहील. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. पण त्याचा वाईट परिणाम या राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येईल.
सूर्यग्रहणाचा या राशींवर होणार वाईट परिणाम होईल
मेष
ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्यग्रहण होईल, त्या वेळी सूर्य मेष राशीत विराजमान होईल. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या राशीच्या लोकांच्या जीवनावर सूर्याचा विपरीत परिणाम होईल. या दरम्यान तुमची अनेक महत्त्वाची कामे रखडतील. कुटुंबात अशांततेचे वातावरण राहील. या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्या. सूर्यग्रहणामुळे मेष राशीच्या लोकांच्या आर्थिक समस्या वाढू शकतात. व्यक्तीला मानसिक तणावाचाही सामना करावा लागू शकतो.
सिंह
सूर्यग्रहणामुळे या राशीच्या राशीच्या लोकांचे काम बिघडेल. या दरम्यान या राशीच्या लोकांना अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात रस राहणार नाही. पण नंतर परिस्थिती त्यांच्यानुसार होईल.
कन्या
कन्या राशीच्या लोकांच्या कुंडलीच्या 8 व्या घरात होणारे सूर्यग्रहण मानसिक त्रास देणारे आहे. या दरम्यान तुमचा राग वाढेल आणि तुम्हाला डोकेदुखीच्या समस्येतूनही जावे लागेल. काही गोष्टींची काळजी घेतल्यास फायदा होईल. या दरम्यान बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा समस्या वाढू शकतात. कोणत्याही प्रवासामुळे नुकसान होऊ शकते. शत्रू वाढतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)