Solar Eclipse 2023 : सूर्य ग्रहणासोबतच जुळून येणार दोन अशुभ योग, या राशींच्या लोकांना ठरणार त्रासदायक
ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. सूर्यग्रहण ज्योतिषशास्त्रात शुभ मानले जात नाही कारण यावेळी सूर्यावर राहूचा प्रभाव वाढतो आणि सूर्य पिडीत होतो. वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल, गुरुवारी होणार आहे.
मुंबई : 20 एप्रिलला सूर्यग्रहण होणार आहे. यावेळी सूर्यग्रहणासोबतच (Solar Eclipse 2023) दोन मोठे अशुभ योगही तयार होत आहेत. या अशुभ योगांच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांच्या अडचणी वाढणार आहेत. ग्रहण ही एक महत्त्वाची खगोलीय घटना आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. सूर्यग्रहण ज्योतिषशास्त्रात शुभ मानले जात नाही कारण यावेळी सूर्यावर राहूचा प्रभाव वाढतो आणि सूर्य पिडीत होतो. वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल, गुरुवारी होणार आहे. हे ग्रहण सकाळी 7.04 ते दुपारी 12.29 पर्यंत राहील. (Solar Eclipse 2023 Time) यावेळी सूर्यग्रहणासोबतच दोन मोठे अशुभ योगही तयार होत आहेत.
सूर्यग्रहणाच्या वेळी राहू आणि बुध सोबत सूर्य मेष राशीत असेल. तर मंगळ बुधाच्या राशीत येईल. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा मेष राशीचा स्वामी मानला जातो आणि बुध मिथुन राशीचा स्वामी मानला जातो. मंगळ मिथुन राशीत आणि बुध मेष राशीत असल्यामुळे राशी बदल होत आहेत. हा ग्रहण योग काही राशींच्या समस्या वाढवणार आहे.
या राशीच्या लोकांच्या समस्या वाढणार
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी ग्रहण योग फारच अशुभ असणार आहे. या राशीच्या लोकांचे आरोग्य बिघडेल. यासोबतच तुमचा मानसिक ताणही वाढेल. यावेळी केलेल्या कामात खूप अडथळे येतील. मेष राशीच्या लोकांना यावेळी कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायाच्या बाबतीत घेतलेले काही निर्णय तुमच्यासाठी चुकीचे ठरू शकतात. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी अनुकूल नाही.
वृषभ
हा अशुभ योग या राशीच्या लोकांच्या आयुष्यात खूप चढ-उतार घेऊन येईल. करिअर आणि कौटुंबिक बाबतीत तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यावेळी अनेक अडचणी एकत्र येतील ज्या हाताळणे तुमच्यासाठी कठीण होईल. वृषभ राशीच्या लोकांच्या स्वभावातही बदल होईल. या ग्रहणाच्या प्रभावामुळे तुमचा राग वाढेल. या दरम्यान तुम्ही कोणत्याही वादातही अडकू शकता. या काळात तुमची आर्थिक स्थितीही बिघडू शकते. तुमच्या उधळपट्टीमुळे तुमची समस्या आणखी वाढेल.
कन्या
अशुभ योगामुळे कन्या राशीच्या लोकांना आरोग्यासंबंधी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याच्या प्रभावामुळे तुमची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होणार आहे. तुमचा कोणताही जुना आजार पुन्हा उद्भवू शकतो. कुटुंबातही एखाद्या गोष्टीबद्दल तुमचा तणाव वाढू शकतो. ग्रहण योगामुळे व्यवसाय किंवा नोकरीशी संबंधित लोकांना कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ऑफिसमध्ये तुम्हाला कामात रस राहणार नाही, त्यामुळे तुम्हाला नाराजीचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला तुमच्या अपेक्षेनुसार लाभ मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही नाराज व्हाल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)