Astrology: सोमवारपासुन सुरू होत आहे पंचक, राशीनुसार केलेल्या दानाने मिळेल शुभ फळ
फाल्गुन अमावस्येच्या मुहूर्तावर गरीब आणि गरजूंना दान करणे विशेषतः फलदायी आहे. शुभ फळ मिळण्यासाठी तुमच्या राशीनुसार कोणते दान आणि विशेष उपाय करावेत हे जाणून घेऊया.
मुंबई : फाल्गुन महिन्यातील अमावस्या सोमवती अमावस्या (Somvati Amavashya Today) म्हणूनही ओळखली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या 20 फेब्रुवारी 2023 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी भगवान विष्णू आणि शिवाची पूजा करणे फायदेशीर ठरते. पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करणे उत्तम मानले जाते. लोकं या तिथीला आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती टिकवून ठेवण्यासाठी व्रत करतात. फाल्गुन अमावस्येच्या मुहूर्तावर गरीब आणि गरजूंना दान करणे विशेषतः फलदायी आहे. शुभ फळ मिळण्यासाठी तुमच्या राशीनुसार कोणते दान आणि विशेष उपाय करावेत हे जाणून घेऊया.
राशीनुसार करा या गोष्टींचे दान
- मेष : सकाळी स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात चिमूटभर कुमकुम टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. चंद्राला प्रसन्न करण्यासाठी दूध किंवा तूप दान करा.
- वृषभ : एक चमचा दूध पाण्यात मिसळून चंद्र देवाला अर्पण करा. तसेच गरीब लोकांना कपडे आणि अन्न दान करा.
- मिथुन : गाईला चारा दान करा. तसेच, चंद्राच्या बीज मंत्राचा जप करा “ओम श्रम श्रम श्रम सह चंद्रमसे नमः”.
- कर्क : चंद्राला अर्घ्य अर्पण करा आणि मंदिरात शंख आणि दूध दान करा.
- सिंह : या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. वृद्धाश्रम किंवा मानसिक आरोग्य केंद्रांमध्ये तुमच्या क्षमतेनुसार दान करा.
- कन्या : या दिवशी शिवलिंगावर पांढरे फूल आणि जल अर्पण करा. मंदिरात चांदीचे कोणतेही दागिने अर्पण करा.
- तूळ : देवी लक्ष्मीला मोती अर्पण करणे लाभदायक ठरेल. या दिवशी मंदिरात दही किंवा तांदूळ दान करा.
- वृश्चिक : चंद्राचा प्रभाव कमी करण्यासाठी रुद्राष्टकांचे पठण करा. दुधापासून बनवलेली मिठाई गरिबांना दान करा.
- धनु : गरिबांना तांदूळ, तूप आणि दूध इत्यादी दान करा आणि वृद्धांची सेवा करा.
- मकर : गरीब मुलींना कपडे आणि अन्न दान करा. भगवान शंकराचा जलाभिषेक करावा.
- कुंभ : मंदिरात पांढऱ्या रंगाचे कपडे, मिठाई, दागिने इत्यादी दान करा.
- मीन : गरिबांना जास्तीत जास्त संख्येने अन्नदान करा. भगवान शंकर आणि चंद्राला अर्घ्य अर्पण करा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)