Astrology: ग्रहांचा राजा सूर्याचा होणार शनीच्या राशीत प्रवेश, चार राशींना मिळणार फक्त पैसाच पैसा!
शनि हा मकर राशीचा स्वामी आहे आणि ज्योतिषशास्त्रात सूर्याला शनीचा पिता मानला जातो...
मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) सूर्याच्या राशीतील बदलाला विशेष महत्त्व दिले जाते. सूर्याल यश, आत्मविश्वास आणि आरोग्यचा कारक ग्रह मानल्या जाते. जेव्हा सूर्य आपली राशी बदलून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांती म्हणतात. 15 जानेवारी 2023 रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे आणि हा सण देशभरात मकर संक्रांत (Makar sankranti 2023) म्हणून साजरा केला जाईल. शनि हा मकर राशीचा स्वामी आहे आणि ज्योतिषशास्त्रात सूर्याला शनीचा पिता मानला जातो. अशाप्रकारे सूर्य वर्षातून एकदा आपला पुत्र शनीच्या राशीत प्रवेश करतो. यावेळी ही संक्रांत खूप खास आहे कारण आधीच शनि मकर राशीत आहे. मकर राशीतील सूर्य आणि शनीचा संयोग 4 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे.
या 4 राशीच्या लोकांना होणार सूर्य संक्रमणाचा विशेष लाभ
- वृषभ: वृषभ राशीच्या लोकांना सूर्याच्या भ्रमणामुळे खूप फायदा होईल. या लोकांना नोकरी आणि व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. नशिबाच्या सहकार्याने सर्व कामे पूर्ण होऊ लागतील. उत्पन्नात वाढ होईल. तुमचा प्रभाव आणि आत्मविश्वास वाढेल. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल.
- मिथुन: सूर्याच्या राशी बदलामुळे मिथुन राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. कामाच्या ठिकाणी वेळ चांगला जाईल. व्यावसायिकांना मोठे यश मिळू शकते. आर्थिक प्रगती होऊ शकते. तणावातून आराम मिळेल.
- कर्क: कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्य संक्रमणाचा प्रभाव खूप शुभ राहील. त्याला त्याच्या प्रिय जोडीदाराची, जीवनसाथीची पूर्ण साथ मिळेल. लांबच्या प्रवासाला जाता येईल. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात. भागीदारीच्या कामात मदत मिळेल.
- मकर: सूर्याचे संक्रमण मकर राशीतच होत असल्याने या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे. या लोकांच्या जीवनात सकारात्मकता येईल. जुन्या समस्यांपासून सुटका मिळेल. रोग दूर होईल. प्रगतीचा मार्ग खुला होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)