Sun Transit 2022: सूर्याच्या राशी परिवर्तनाने चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब

ज्योतिषशास्त्रात (astrology) ग्रहांच्या राशी बदलाला विशेष महत्त्व आहे. जेव्हा जेव्हा एखादा ग्रह एका राशीत असतो आणि नंतर दिलेल्या वेळी दुसर्‍या राशीत बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर शुभ आणि अशुभ दोन्ही दिसून येतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, सूर्य दर महिन्याला राशी बदलतो (Sun Transit 2022). कुंडलीत सूर्य शुभ भावात असल्यास त्या व्यक्तीला नोकरी, मान-सन्मान आणि पैसा मिळतो. […]

Sun Transit 2022: सूर्याच्या राशी परिवर्तनाने चमकणार 'या' तीन राशींचे नशीब
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 10:15 AM

ज्योतिषशास्त्रात (astrology) ग्रहांच्या राशी बदलाला विशेष महत्त्व आहे. जेव्हा जेव्हा एखादा ग्रह एका राशीत असतो आणि नंतर दिलेल्या वेळी दुसर्‍या राशीत बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर शुभ आणि अशुभ दोन्ही दिसून येतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, सूर्य दर महिन्याला राशी बदलतो (Sun Transit 2022). कुंडलीत सूर्य शुभ भावात असल्यास त्या व्यक्तीला नोकरी, मान-सन्मान आणि पैसा मिळतो. 15 जून रोजी सूर्य देव वृषभ राशीतून मिथुन राशीत गोचर म्हणजेच राशी परिवर्तन करणार आहे. सूर्याच्या गोचराचे सर्व राशींवर वेगवेगळे परिणाम होतील, काहींसाठी ते शुभ तर काहींसाठी अशुभ असू शकतात. सूर्याच्या या राशी बदलामुळे कोणत्या जातकांवर शुभ परिणाम होणार आहेत तसेच कोणावर  अशुभ परिणाम होणार आहेत. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

  1. वृषभ- सूर्य, ग्रहांचा अधिपती, वृषभ राशीच्या चौथ्या घराचा स्वामी आहे आणि आता 15 जून रोजी, मिथुन राशीत, सूर्य दुसऱ्या घरात प्रवेश करेल. आर्थिकदृष्ट्या, या काळात तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्ही या वेळी कोणत्याही मालमत्तेमध्ये किंवा जमिनीत गुंतवणूक केली तर चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही सरकारी क्षेत्रात नोकरी करत असाल तर तुम्हाला सरकार आणि तुमच्या उच्च अधिकार्‍यांकडून  सहकार्य आणि लाभ मिळण्याची शक्यता आहे.
  2. सिंह- रवि तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि सूर्याचे हे राशी परिवर्तन तुमच्या राशीला तुमच्या आर्थिक जीवनात विविध स्त्रोतांकडून लाभ मिळण्याची शक्यता निर्माण करेल. या व्यतिरिक्त यावेळी तुमचे उत्पन्न वाढवणे देखील शक्य आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. तसेच समाजात तुमचा सन्मान देखील वाढेल. त्याचबरोबर प्रेमसंबंधांसाठीही काळ चांगला राहील. यासोबतच नोकरीच्या ठिकाणी बढती मिळाल्याने आनंदाचा अनुभव येईल.
  3. मकर- मकर राशीच्या लोकांच्या आठव्या घराचा स्वामी सूर्य आहे आणि आता तो तुमच्या राशीतून सहाव्या घरात असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास कायम ठेवा आणि कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक विचारांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. आर्थिक परिस्थिती विषयी बोलायचे झाल्यास तुम्ही कर्ज घेतले असेल, तर या कालावधीत तुम्ही ते फेडण्यास सक्षम असाल. त्याचबरोबर ज्या लोकांचा कोर्टात खटला चालू होता, त्याचाही निर्णय सूर्य देवाच्या कृपेने तुमच्या बाजूने होताना दिसेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

हे सुद्धा वाचा
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.