Sun Transit : सूर्याच्या राशी परिवर्तनाने या राशीच्या लोकांचे भाग्य चमकणार, मिळणार वडिलांचे प्रेम

या राशीच्या लोकांसाठी सूर्यदेव चौथ्या घराचा स्वामी आहे. 16 डिसेंबर 2023 रोजी सूर्यदेव आठव्या भावात प्रवेश करतील. आठवे घर दीर्घायुष्य, अचानक घडणाऱ्या घटना आणि गूढ रहस्य इत्यादींचे घर मानले जाते. वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्य देवाचे संक्रमण शुभ मानले जाऊ शकत नाही.

Sun Transit : सूर्याच्या राशी परिवर्तनाने या राशीच्या लोकांचे भाग्य चमकणार, मिळणार वडिलांचे प्रेम
सूर्य गोचर
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 10:55 AM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology), सूर्य देवाला सर्व ग्रहांचा राजा मानले जाते आणि त्याचमुळे जेव्हा सूर्य राशी बदलतो तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो.पंचांगानुसार, सूर्यदेव 16 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 03.47 वाजता धनु राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिषी पराग कुळकर्णी यांच्यानुसार सूर्यदेवाचे हे राशी परिवर्तन या राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी ठरेल. पत्रिकेत सूर्याचा संबंध नोकरी, व्यावसाय, वडिल आणि आरोग्याशी आहे. यंदा होणारे सूर्याच्या राशी परिवर्तनाने वडीलांची मोलाची साथ लाभणार आहे.

मेष राशीच्या जातकांना मिळणार वडिलांचे प्रेम

मेष राशीच्या लोकांसाठी, सूर्य 5 व्या घराचा स्वामी आहे आणि आता 16 डिसेंबर 2023 रोजी मेष राशीसाठी 9 व्या भावात प्रवेश करेल. ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील हे घर धर्म, पिता, गुरु, लांबचा प्रवास आणि भाग्याचे आहे. सूर्य देवाच्या प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांना वडील आणि गुरूचे प्रेम मिळेल. उच्च शिक्षणात यश मिळेल. शैक्षणिक सहलीलाही जाता येईल. कुटुंबातील सर्वांशी नात्यात गोडवा राहील. मेष राशीच्या लोकांनी सूर्य देवाला प्रसन्न करण्यासाठी वडिलांचा आदर करावा. घराबाहेर पडताना वडिलांच्या चरणांना स्पर्श करावा.

वृषभ राशीच्या जातकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी

वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्यदेव चौथ्या घराचा स्वामी आहे. 16 डिसेंबर 2023 रोजी सूर्यदेव आठव्या भावात प्रवेश करतील. आठवे घर दीर्घायुष्य, अचानक घडणाऱ्या घटना आणि गूढ रहस्य इत्यादींचे घर मानले जाते. वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्य देवाचे संक्रमण शुभ मानले जाऊ शकत नाही. या काळात वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास कमी होईल. तुम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रास होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक जीवनातही तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नवीन घर किंवा वाहन घ्यायचे असेल तर काही काळ थांबा. वाहन चालवतानाही काळजी घ्या. वृषभ राशीच्या लोकांनी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी रोज आदित्य हृदयम् स्तोत्राचा पाठ करावा.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.