Surya Gochar : सूर्य करणार आपल्याच नक्षत्रात प्रवेश, तीन राशीच्या जातकांना मिळणार पाठबळ

Surya Gochar : नवग्रहांमध्ये सूर्याला राजाचा दर्जा देण्यात आला आहे. सूर्याच्या अधिपत्याखाली ग्रहमंडळ फिरत असतं. त्यामुळे सूर्याची स्थिती राशीचक्रावर परिणाम घडवून आणते.

Surya Gochar : सूर्य करणार आपल्याच नक्षत्रात प्रवेश, तीन राशीच्या जातकांना मिळणार पाठबळ
सूर्य गोचर
Follow us
| Updated on: Sep 12, 2023 | 5:55 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेव राशी बदलासोबत नक्षत्र गोचरही करतात. त्यामुळे राशी बदल आणि नक्षत्रातील स्थिती खूप महत्त्वाची ठरते. सूर्यदेव एका महिन्याच्या कालावधी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. तर एका ठरावीक कालावधीनंतर नक्षत्र बदल करतात. सूर्यदेव 17 सप्टेंबर 2023 रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तत्पूर्वी सूर्यदेव उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. 14 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 3 वाजून 38 मिनिटांनी हा प्रवेश असणार आहे. या नक्षत्राचं स्वामित्व सूर्यदेवांकडे आहे. 27 नक्षत्रातील हे नक्षत्र 12 व्या स्थानी आहे. सूर्याच्या बदलामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. काही राशींना लाभ, तर काही राशींना परिणाम भोगावे लागू शकतात. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना लाभ होणार ते…

या तीन राशींना होणार लाभ

मिथुन : या राशीच्या जातकांवर सध्या ग्रहांची अनुकूल स्थिती आहे. सूर्याने स्व नक्षत्रात प्रवेश करताच या जातकांना लाभ मिळण्यास सुरु होईल. एखादी मोठी डील या कालावधीत पूर्ण होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येतील. आत्मविश्वास दुणावलेला राहील. एखादा छोटासा बिझनेस बराच लाभ देऊन जाईल. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार या कालावधीत करू शकता. तुम्हाला त्याचा चांगला परिणाम दिसून येईल.नवीन आर्थिक स्रोत या कालावधीत तयार होतील. प्रवासाचा योग जुळून येईल.

सिंह : या राशीचा स्वामी ग्रह सूर्यच आहे. सध्या या राशीत असून 17 सप्टेंबरला कन्या राशीत प्रवेश करेल. त्यामुळे सूर्याची धनस्थानातील स्थिती या राशीसाठी फलदायी ठरेल. समाजात मानसन्मान वाढेल. तुमच्या नेतृत्व गुणांना वाव मिळेल. तुमच्या माध्यमातून घेतलेले निर्णय प्रभावी ठरतील. तुमच्या कामाचं कौतुक होत असल्याने तुम्हीही कामं आत्मयितेने पूर्ण कराल. कौटुंबिक स्तरावर वातावरण चांगलं राहील. वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

धनु : या राशीच्या नवव्या स्थानाचा स्वामी सूर्य आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती या कालावधीत भक्कम होईल. तुमच्या कामाचा सकारात्मक प्रभाव इतरांवर पडेल. त्यामुळे तुमच्या कामाचा ओघ वाढेल. तुमच्या माध्यमातून कामं झटपट पूर्ण होत असल्याने मानसन्मान वाढेल. तुमच्याकडे भेटवस्तूंचा ढीग येईल. समाजात मानसन्मान वाढेल, तसेच कार्यक्रमांमध्ये बोलवलं जाईल. कौटुंबिक स्तरावरही सकारात्मक बदल दिसतील. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.