13 फेब्रुवारी 2023 रोजी कुंभ संक्रात! सिंह, तूळेसह या राशींना होणार फायदा

Surya Gochar In Kumbh Rashi: सूर्यदेव मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीपरिवर्तनामुळे काही राशींना अनुकूल परिणाम दिसून येतील. मात्र बुधाची चाल पाहूनच पावलं उचलावी.

13 फेब्रुवारी 2023 रोजी कुंभ संक्रात! सिंह, तूळेसह या राशींना होणार फायदा
सूर्यदेव करणार मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश, पाच राशींवर राहील कृपा
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 4:10 PM

मुंबई: ज्योतिषशास्त्राचं संपूर्ण गणित हे नक्षत्र आणि ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतं. ग्रहमंडळातील प्रत्येक ग्रह ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करत असतो. ग्रह कोणत्या राशीत आणि नक्षत्र काय आहे यावरही सर्वकाही अवलंबून असतं. सूर्यदेव जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात या स्थितीला संक्रांत असं म्हंटलं जातं.आता महिनाभर मकर राशीत विसावा घेतल्यानंतर सूर्यदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. 13 फेब्रवारी 2023 रोजी कुंभ संक्रांती आहे. त्यात बुध ग्रह 7 फेब्रुवारीला गोचर करणार असल्याने पुढचे दहा दिवस मोठी उलथापालथ पाहायला मिळणार आहे. कुंभ ही शनिची स्वरास आहे. त्यात सूर्य आणि शनि यांच्या शत्रुत्व आहे. त्यामुळे काही राशींना त्रास सहन करावा लागेल. तर काही राशींसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. मेष, मिथुन,सिंह आणि तूळ राशीला या काळात चांगली फळं मिळतील.

या राशींना मिळणार सूर्य गोचराचा लाभ

मेष- या राशीच्या जातकांना सूर्य गोचराचा लाभ मिळणार आहे. जमिनीच्या व्यवहारात चांगला आर्थिक लाभ होईल. तसेच आर्थिक स्थिती या काळात सुधारणार असल्याने कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. अडकलेली कामं या काळात पूर्ण होतील. म्हणजेच सूर्याच्या गोचरानंतर मेष राशीच्या लोकांना लाभ मिळेल.

मिथुन- या राशीच्या लोकांची नुकतीच शनि अडीचकीतून सुटका झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गाडी पुन्हा एकदा रुळावर आणणारं ग्रहमान आहे. व्यवसायात योग्य मेहनत घेतल्यास उत्तम फळ मिळेल. या काळात वाहन खरेदीचा योग आहे. तसेच समाजात मान सन्मान वाढेल. असं असलं तरी महिन्याच्या शेवटी वाहन जरा जपूनच चालवा.

सिंह- या राशीच्या लोकांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. महिन्याच्या सुरुवातीला अडीचणी आल्या, त्या आता दूर होणार आहेत. त्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. तसेच पगारवाढ आणि पदोन्नती होण्याची शक्यता आहे. असं असलं तरी घरात काही कारणांवरून वाद होऊ शकतो. त्यामुळे वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

तूळ- या राशीचे लोक गेल्या काही दिवसांपासून चांगल्या स्थितीची वाट पाहात होतो.आता ग्रहांची स्थिती अनुकूल असणार आहे. नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. घरात आनंदाचं वातावरण असेल. तसेच घरात धार्मिक कार्य होण्याची दाट शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. महिन्याच्या शेवटी आरोग्याची काळजी घ्यावी. पोटासंदर्भातील विकार होण्याची दाट शक्यता आहे.

मीन- या राशीला सध्या शनि साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. असं असताना शनिदेव अस्ताला गेल्याने थोडी ढील मिळाली आहे. त्यात सूर्यदेवाच्या मार्गक्रमणामुळे काही दिवस चांगले जातील. बेरोजगार तरुणांना नोकरीची नवी संधी मिळेल. कार्यक्षेत्रात कामाचं कौतुक होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. कौटुंबिक जीवनही आनंददायी राहील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.