सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशानंतर या जातकांना मिळणार साथ, कोणत्या लकी राशी ते जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचं एक मंडळ असून त्याचा राजा सूर्य आहे. सूर्य एका राशीत महिनाभर राहिल्यानंतर परिवर्तन करतो. आता वर्षभरानंतर सूर्यदेव मकर राशीत आला आहे. त्यामुळे काही राशींचं नशिब फळफळणार आहे. चला जाणून घेऊयात या लकी राशी कोणत्या त्या
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा ग्रहमंडळाचा राजा आहे. तसेच आत्मविश्वास आणि नेतृत्वाचा कारक ग्रह म्हणून गणला जातो. सूर्यामुळे समजात प्रतिष्ठा, मानसन्मान आणि मनासारखी नोकरी मिळते. त्यामुळे सूर्योपसानेचं महत्त्व अधोरेखित होतं. सूर्यदेव एका राशीत महिनाभर ठाण मांडून बसल्यानंतर गोचर करतात. आता सूर्यदेव वर्षभरानंतर मकर राशीत आले आहेत. सूर्याच्या गोचराला संक्रांती म्हंटलं जातं. मकर ही शनिची रास आहे. तसेच शनि हा सूर्याचा पुत्र असून त्यांचं कधीच एकमेकांशी पटत नाही. असं असलं तरी सूर्याची कृपा तीन राशींच्या जातकांवर होणार आहे. सूर्यासारखं या तीन राशीच्या जातकांना मिळेल. तसेच अकस्मात धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना लाभ मिळेल ते..
कर्क : या राशीच्या सप्तम स्थानात सूर्य गोचर करत आहे. त्यामुळे लग्न झालेल्या जातकांना याची चांगली अनुभूती मिळेल. पत्नीची उत्तम साथ या कालावधीत मिळेल. त्याचबरोबर सूर्य हा दुसऱ्या स्थानाचा स्वामी असल्याने धनस्थान आणखी प्रबळ होईल. त्यामुळे या कालावधीत बऱ्याच आर्थिक उलाढाली होतील. तसेच पैसा हाती खेळता राहील. पावलापावलांवर आर्थिक समीकरणं बदलताना दिसतील. पैसा हाती असला की समाजात मानसन्मान वाढतो. पार्टनरशिपच्या धंद्यात अपेक्षित यश मिळेल.
मकर : या राशीतच सूर्यदेव गोचर करत येणार आहे. त्यामुळे लग्न स्थान असल्याने आत्मविश्वास दुणावलेला राहील. आर्थिक स्थिती एकदम मजबूत राहील. आपला प्रभाव व्यवसाय आणि नोकरीवर पडेल. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. नोकरी करणाऱ्या जातकांना पगारवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. नवीन करार या कालावधीत निश्चित होऊ शकतो.
धनु : सूर्य या राशीच्या दुसऱ्या म्हणजेच धन आणि वाणीच्या स्थानात गोचर करत आहे. त्यामुळे जातकांना अकस्मित धनलाभ होऊ शकतो. आर्थिक पैसा कमवण्याचे नवे स्रोत या कालावधीत तयार होतील. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. शेअर बाजार किंवा लॉटरीतून अकस्मात लाभ होऊ शकतो. या कालावधीत देवदर्शनाला जाण्याचा योगही जुळून येईल. वाणीचा प्रभाव दिसून येईल. आपल्या प्लानिंगनुसार घडामोडी घडताना दिसतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)