सूर्याच्या गोचरानंतर दोन दिवसांनी शनिची वक्री चाल, दोन राशींना मिळणार पाठबळ
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती वेळोवेळी बदलत असते. जून महिन्यात तर सूर्याच्या गोचरानंतर शनिदेवही वक्री होणार आहेत. त्यामुळे दोन राशीच्या जातकांना फायदा होणार आहे.
मुंबई : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर आपली रास बदलत असतो. काही दिवस एका राशीत ठाण मांडून बसल्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. प्रत्येक ग्रहाची गोचराची वेळ ही कमी अधिक असल्याने त्याचा राशीचक्रावर परिणाम होतो. ग्रहांचा राजा सूर्यदेव आणि न्यायदेवता शनि महाराजांची स्थिती काही जातकांना फलदायी ठरणार आहे. या स्थितीचा मिथुन, सिंह, कन्या आणि मकर राशीच्या जातकांना फायदा होईल. काही जातकांना तर नोकरी आणि उद्योगात या स्थितीचे सकारात्मक बदल दिसतील. 15 जून रोजी सूर्य वृषभ राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 17 जून रोजी शनिदेव स्वत:च्या कुंभ राशीत वक्री होणार आहे.
पंचांगानुसार सूर्यदेव 15 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजून 58 मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करतील. त्यानंतर 17 जून 2023 रोजी शनिदेव रात्री 10 वाजून 48 मिनिटांनी कुंभ राशीत वक्री स्थितीत जातील. त्यामुळे या स्थितीचा सर्वाधिक फायदा दोन राशीच्या लोकांना होणार आहे.
या दोन राशींना सूर्य आणि शनिचा आशीर्वाद मिळेल
मिथुन : सूर्यदेव या राशीच्या पहिल्या म्हणजेच लग्न भावात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. या राशीच्या जातकांना अनेक टप्प्यांवर सहज यश मिळताना दिसेल. दुसरीकडे शनिची वक्री स्थितीही मिथुन राशीच्या जातकांना फलदायी ठरणार आहे. यामुळे घरात सुख शंती नांदेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. मुलांकडून काही शुभ बातमी कानावर पडण्याची शक्यता आहे.
सिंह : या राशीच्या जातकांनाही सूर्य आणि शनिची वक्री चाल लाभदायी ठरणार आहे. करिअर आणि व्यवसायात चांगले परिणाम दिसून येतील. एखादा नवीन व्यवसाय या काळात सुरु करू शकता. अर्धवट राहिलेली कामं या काळात पूर्ण करू शकता. नशिबाची पूर्ण साथ या काळात मिळेल. जोडीदाराकडून कठीण काळात सहकार्य मिळाल्याने डोक्यावरील ताण कमी होईल. प्रत्येक कामात हिरिरीने भाग घ्याल, तसेच समाजात मान सन्मान वाढेल. आध्यात्मिक प्रवास घडण्याची शक्यता आहेत.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)