Surya Gochar 2023: एक वर्षानंतर सूर्य करणार वृषभ राशीत गोचर, तीन दिवसानंतर या राशींना मिळणार फळ

राशीचक्रात नऊ ग्रहांचं भ्रमण होत असतं. कोणत्या स्थानात ग्रह स्थित आहे त्यावरून भाकीत वर्तवलं जातं. आता ग्रहांचा राजा सूर्यदेव गोचर करणार आहे. यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येईल.

Surya Gochar 2023: एक वर्षानंतर सूर्य करणार वृषभ राशीत गोचर, तीन दिवसानंतर या राशींना मिळणार फळ
Surya Gochar 2023: सूर्याचं गोचर चार राशींना ठरणार फलदायी, तीन दिवसानंतर कशी असेल स्थिती? वाचा
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 5:40 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात सूर्य ग्रह हा सर्वात महत्त्वाचा ग्रह आहे. सूर्य ग्रहाला आत्मा, पिता आणि राजकारणाचा कारक ग्रह मानलं जातं. जातकाच्या कुंडलीत सूर्य ग्रह मजबूत स्थितीत असेल तर जातकाला उच्च पद आणि मानसन्मान मिळतो. सूर्यदेवांची मेष ही उच्च रास, तर तूळ ही नीच रास आहे. सूर्यदेव एका राशीत महिनाभर राहून गोचर करतात. सूर्याच्या गोचराला संक्रांती असं म्हंटलं जातं. येत्या 15 मे रोजी वृषभ संक्रांती आहे. या दिवशी सूर्य मेष राशीतून वृषभ राशीत गोचर करणार आहे. वर्षभरानंतर सूर्यदेव वृषभ राशीत येणार आहेत.

सूर्यदेव वृषभ राशीत 15 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजून 32 मिनिटांनी गोचर करेल. या राशीत महिनाभर राहिल्यानंतर 15 जून 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून 7 मिनिटांनी बुधाचं स्वामित्व असलेल्या मिथुन राशीत गोचर करेल. सूर्य मिथुन राशीत 30 दिवस राहील यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येईल.

सूर्याच्या राशी गोचरानंतर या राशींसाठी अच्छे दिन

वृषभ : सूर्यदेव या राशीच्या चतुर्थ स्थानाचे स्वामी आहेत. या राशीत गोचर करत सूर्यदेव प्रथम स्थानात असतील. त्यामुळे कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. तुम्हाला कुटुंबाची चांगी साथ मिळेल. आईकडून तुम्हाला काही मौल्यवान वस्तू मिळू शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा काळ चांगला असेल. मेहनतीच्या जोरावर या काळात यश संपादन कराल.

कर्क : या राशीच्या दुसऱ्या स्थानाचा स्वामी सूर्य आहे. गोचर कालावधीत सूर्यदेव एकादश भावात गोचर करणार आहे. त्यामुळे या काळात मनातील काही इच्छा पूर्ण होतील. मित्रांशी भेट होईल, तसेच काही नवीन ओळखी तयार होतील. वैवाहित जीवनात सूर्याचा चांगला प्रभाव असेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती या काळात सुधारेल. पदोन्नती किंवा वेतनवाढ या काळात होऊ शकते.

सिंह : ही सूर्याची स्वामित्त्व असलेली रास आहे. सूर्य गोचर या राशीच्या दहाव्या स्थानात होत आहे. त्यामुळे करिअरमध्ये चांगले परिणाम या काळात दिसून येतील.नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना नोकरी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी चांगल्या पदावर वर्णी लागेल. गुप्तशत्रू तुमच्या चांगल्या काळामुळे आसपासही येणार नाही. समाजात मानसन्मान वाढेल.

मकर : या राशीच्या अष्टम स्थानाचा स्वामी सूर्य आहे. गोचर पाचव्या स्थानात होत आहे. त्यामुळे या काळात अध्यात्माकडे रुची वाढेल. जोडीदाराकडून चांगलं सहकार्य मिळेल. या काळात नोकरीमध्ये बदल होऊ शकतो. या काळात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल.

मीन : या राशीच्या तिसऱ्या आणि सहाव्या स्थानाचा स्वामी सूर्य आहे. सूर्यदेव सहाव्या स्थानात गोचर करत आहे. त्यामुळे या काळात आत्मविश्वास दुणावलेला राहील. करिअरमध्ये काही उत्तुंग शिखरं गाठाल. अभ्यासात विद्यार्थ्यांना सूर्याची साथ मिळेल. तसेच एकाग्रता वाढलेली दिसेल. या काळात तीर्थ यात्रा करण्याचा योग जुळून येईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.