Surya Grahan 2023: सूर्यग्रहणाच्या दिवशी सहा राशींवर असेल शनिची वक्रदृष्टी, या जातकांना होईल त्रास
Surya Grahan 2023 : या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण आता काही तासांवर येऊन ठेपलं आहे. ही खगोलीय घटना असली तर ज्योतिषशास्त्रात या घटनेला खूपच महत्त्व आहे. सूर्यावर राहु केतुची छाया आणि शनिची वक्रदृष्टी असणार आहे. त्यामुळे सहा राशीच्या लोकांना सावध राहावं लागेल.
मुंबई : सूर्यग्रहणाकडे ज्योतिषशास्त्राचं नजर लागून आहे. हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसलं तरी त्याचा परिणाम राशीचक्रावर होणार आहे. सूर्यग्रहण मेष राशी आणि अश्विन नक्षत्रात असणार आहे. मेष ही सूर्याची उच्च रास असून याच राशीत राहु आहे. त्याचबरोबर कुंभ राशीत बसलेल्या शनिची सूर्यावर तिसरी दृष्टी म्हणजेच वक्री दृष्टी आहे. या स्थितीमुळे काही राशींच्या अडचणीत वाढ होणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहण आणि शनिची वक्रीदृष्टी यामुळे वृषभ, कन्या, तूळ, धनु, मकर आणि मीन राशीवर परिणाम होईल. त्या तुलनेत मेष आणि कर्क राशीला कमी त्रास होईल. दुसरीकडे मिथुन, सिंह, वृश्चिक आणि कुंब राशीचे जातक अशुभ स्थितीत नसतील.
सूर्यग्रहणातील 2 अशुभ योग
सूर्यग्रहणाच्या दिवशी, सूर्य आपल्या अशुभ ग्रह राहूसह मेष राशीत बसेल. सूर्य आणि राहू व्यतिरिक्त बुध देखील या राशीत असेल. दुसरा, मंगळ मिथुन राशीत असेल, बुधाच्या मालकीचा. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा मेष राशीचा स्वामी मानला जातो आणि बुध मिथुन राशीचा स्वामी मानला जातो. म्हणूनच मंगळ आणि बुध एकमेकांच्या राशीत असल्यामुळे ग्रहण योग तयार होत आहे. सूर्यग्रहणाच्या दिवशी तयार झालेले हे दोन्ही योग अत्यंत अशुभ मानले जातात.
सहा राशीच्या जातकांनी राहा सावध
सूर्यग्रहणाच्या वेळी वृषभ, कन्या, तूळ, धनु, मकर आणि मीन राशीच्या जातकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. कारण या राशीचे जातक अडचणीत येण्याची शक्यता आहे. तुमची होणारी कामं अडकू शकतात. तसेच विनाकारण वाद होऊ शकतो. तसेच आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या काळात कोणताही मोठा व्यवहार करू नका. कारण आर्थिक फटका बसण्याची दाट शक्यता आहे.
या राशींनी निश्चिंत राहावं
सूर्यग्रहणादरम्यान मिथुन, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या जातकांना काळजी करण्याची तशी गरज नाही. कारण या राशींवर अशुभ परिणाम होणार नाही. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होऊ शकतो. नशिबाची पूर्ण साथ या काळात मिळेल. तसेच कौटुंबिक वातावरण चांगलं राहिल्याने फायदा होईल. मित्रांचं सहकार्य मिळेल.
दुसरीकडे, मेष आणि कर्क राशीवर या ग्रहणाचा तसा फटका बसणार नाही. रोजच्या कामं होत राहतील. पण या काळात खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. जुन्या आजारामुळे अस्वस्थता वाढेल. त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)