Astrology 2023 : राहु गुरुला जाळ्यात ओढण्यापूर्वी सूर्याला गिळणार, या राशींसाठी काळ ठरणार अडचणीचा

Astrology 2023 : एप्रिल महिन्यात ग्रहांची स्थिती बदलत असून याचा परिणाम दूरोगामी असणार आहे. कारण शनिनंतर सर्वाधिक काळ एका राशीत राहणारा गुरु ग्रह राशी बदल करणार आहे. त्यात सूर्यग्रहण असल्याने 4 राशींची अडचण वाढणार आहे.

Astrology 2023 : राहु गुरुला जाळ्यात ओढण्यापूर्वी सूर्याला गिळणार, या राशींसाठी काळ ठरणार अडचणीचा
Astrology 2023 : चांडाळ योग सुरु होण्यापूर्वी सूर्यासमोर उभा ठाकणार राहु, या राशींसाठी असेल प्रतिकूल परिस्थिती
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 1:14 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं गोचर, नक्षत्र, युती आघाडी आणि त्यांचे होणारे परिणाम यावर अवलंबून असतं. गुरु ग्रह येत्या काही दिवसात राशी बदल करणार आहे. तत्पूर्वी सूर्यग्रहण लागणार आहे. ज्योतिषशास्त्रीय भाषेत सांगायचं तर राहु सुर्याला गिळणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी हा काळ अडचणींचा ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 20 एप्रिल 2023 रोजी सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण मेष राशी आणि अश्विन नक्षत्रात असणार आहे. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 22 एप्रिल रोजी गुरु ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे सूर्यग्रहणाचा वाईट प्रभाव काही राशींवर होणार आहे.

या राशीच्या लोकांनी सावध राहावे

मेष : या राशीच्या जातकांना सूर्यग्रहण त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे या काळात कोणतंच नवीन कार्य सुरु करण्याची जोखीम घेऊ नका. वैवाहिक जीवनात तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच काही ठिकणी फसवणूक तसेच आर्थिक व्यवहार अडकण्याची शक्यता आहे. या काळात वाहन सावधपणे चालवा. मानसिक तणामुळे कौटुंबिक वातावरण बिघडेल. आरोग्यविषयक तक्रारी या काळात दिसून येतील. नोकरी करणाऱ्या जातकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

वृषभ : सूर्यग्रहण वृषभ राशीच्या जातकांना अडचणीचं ठरणार आहे. कारण या राशीच्या 12 व्या म्हणजेच व्यय स्थानात सूर्यग्रहणाचा प्रभाव पडणार आहे. त्यामुळे अकारण अवास्तव खर्च होईल. त्यामुळे आर्थिक अडचण जाणवेल. या काळात वडिलधाऱ्या व्यक्तींची काळजी घ्या. हितशत्रू तुमच्यावर नजर ठेवून असतील. त्यामुळे वाद होईल अशी स्थिती टाळा. न्यायालयीन प्रकरणात अडकू शकता. नोकरीच्या ठिकाणीही तुम्हाला त्रास होऊ शकतो.

कन्या : या राशीच्या अष्टम भावात सूर्यग्रहण होणार आहे. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच आरोग्य विषयक तक्रार तुम्हाला जाणवू शकते. जर या काळात राहु किंवा सूर्याची महादशा सुरु असेल तर आणखी काळजी घेण्याची गरज आहे. व्यवसायिकांनी कोणाताही मोठा करार करण्यापूर्वी सल्ला घ्यावा. अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकतं.

वृश्चिक : या राशीच्या षष्टम भावात सूर्यग्रहण होत आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना गुप्त शत्रूंचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर घरी आणि नोकरीच्या ठिकाणी वातावरण एकदम नकारात्मक जाणवेल. त्यामुळे खचून जाऊ नका. देवाचं नामस्मरण करत राहा. तसेच वाद होईल असं कृती किंवा अपशब्द बोलू नका. कारण एक चूक तुम्हाला चांगलीच महागात पडू शकते. आर्थिक नुकसान या काळात होऊ शकते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.