Surya Puja : रविवारचा हा उपाय आहे अत्यंत सोपा आणि प्रभावी, होते मानसन्मानात वृद्धी

पत्रिकेत सूर्य शुभ स्थितीत असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात खूप प्रगती होते आणि प्रत्येक कामात यश मिळते. सूर्याच्या चांगल्या स्थितीमुळे व्यक्तीचे आरोग्य नेहमीच चांगले राहते.

Surya Puja : रविवारचा हा उपाय आहे अत्यंत सोपा आणि प्रभावी, होते मानसन्मानात वृद्धी
सूर्य उपासना
Follow us
| Updated on: Oct 08, 2023 | 10:18 AM

मुंबई : रविवार हा सूर्य देवाला (Surya Upasana) समर्पित आहे. सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. सूर्य देवाला ग्रहांचा राजा म्हणतात. पत्रिकेत सूर्य शुभ स्थितीत असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात खूप प्रगती होते आणि प्रत्येक कामात यश मिळते. सूर्याच्या चांगल्या स्थितीमुळे व्यक्तीचे आरोग्य नेहमीच चांगले राहते. पत्रिकेत सूर्याचे बलवान स्थान जीवनात सुख, संपत्ती आणि कीर्ती मिळवून देते. जर सूर्य दूर्बल किंवा पीडित स्थितीत असेल तर व्यक्ती अनेकदा आजारी राहतो, धन आणि मान-सन्मान हानी होते आणि त्याने केलेले कामही बिघडू लागते. रविवारी काही विशेष उपाय केल्याने सूर्य देव प्रसन्न होतात. सूर्याच्या कृपेने मार्गातील सर्व अडथळे दूर होतात. चला जाणून घेऊया रविवारी करावयाच्या या खास उपायांबद्दल.

हे काम रविवारी करा

  • रविवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. अर्घ्य अर्पण करताना ‘ओम सूर्याय नमः ओम वासुदेवाय नमः ओम आदित्य नमः’ या मंत्राचा जप करावा. असे मानले जाते की यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
  • रविवारी सूर्याला जल अर्पण करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. या दिवशी सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करणे शुभ मानले जाते. यासोबतच सूर्यदेवाला फुले, रोळी, अक्षत आणि साखरेचा प्रसाद अर्पण करणे देखील शुभ मानले जाते.
  • रविवारी कपाळावर चंदनाचा टिळा लावणे खूप शुभ मानले जाते. घरातून बाहेर पडताना कपाळावर चंदनाचा तिलक लावावा. असे केल्याने सर्व महत्वाची कामे यशस्वी होतात असे मानले जाते. यासोबतच रविवारी लाल रंगाचे कपडे घालणे देखील चांगले मानले जाते.
  • देशी तूप हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे रविवारी घराच्या बाहेरील दरवाजाच्या दोन्ही बाजूला देशी तुपाचे दिवे लावावेत. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तिला धन-समृद्धीचा आशीर्वाद देते.
  • रविवारी काही वस्तूंचे दान करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी गूळ, दूध, तांदूळ आणि कपडे दान करा. त्यामुळे कामातील सर्व अडथळे दूर होतात.
  • रविवारी वटवृक्षाचे तुटलेले पान आणा, त्या पानावर तुमची इच्छा लिहा आणि वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. हा उपाय केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.