Surya Rashi Parivartan 2023 : सूर्याचं मिथुन राशीत गोचर, या राशींच्या जातकांनी महिनाभर जरा सांभाळूनच
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्याला आपली रास बदलत असतो. महिनाभर वृषभ राशीत राहिल्यानंतर आजपासून (15 जून) मिथुन राशीत महिनाभरासाठी असणार आहे. चार राशींच्या जातकांना या काळात बसेल फटका
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहमंडळात सूर्यदेवांना राजाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे सूर्याची स्थिती खूप महत्त्वाची ठरते. 15 जूनपासून महिनाभर सूर्य मिथुन राशीत असणार आहे. मिथुन ही बुधाची स्वामित्व असलेली रास आहे. बुध आणि सूर्य हे दोन्ही मित्र ग्रह आहे. सूर्य या राशीत 17 जुलैपर्यंत असणार आहे. सूर्याच्या गोचरामुळे काही राशींना लाभ तर काही राशींना फटका बसणार आहे. असं असलं तरी महिनाभर चार राशीच्या जातकांनी जरा जपून राहणं गरजेचं आहे. या काळात आर्थिक नुकसान तसेच आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढू शकतात. चला जाणून घेऊयात या राशींबाबत
सूर्य गोचर करणार असल्याने चार राशींना बसणार फटका
वृषभ : सूर्याने मिथुन राशीत गोचर करताच वृषभ राशीच्या जातकांचं टेन्शन वाढणार आहे. त्यामुळे या काळात सतर्क राहणं गरजेचं आहे. या काळात आरोग्य विषयक तक्रारी डोकं वर काढू शकते. प्रवास करताना काळजी घेणं गरजेचं आहे. गाडी चालवताना सुरक्षेचे सर्व नियम पाळा. अन्यथा लांबचा प्रवास टाळला तरी चालेल. या काळात वाणीवर नियंत्रण ठेवून निष्कारण वाद टाळावे.
कर्क : सूर्याच्या गोचरामुळे कर्क राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागेल. या काळात शत्रूपक्ष हावी होईल आणि मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. तसेच गुंतवणुकीतून आर्थिक नुकसान होऊ शकते. या काळात तब्येतीकडे दुर्लक्ष करून चालणार आहे. जुन्या आजारामुळे तुम्ही त्रस्त व्हाल. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
वृश्चिक : या राशीच्या जातकांना सूर्याचं गोचर चांगलंच महागात पडणार आहे. महिनाभर त्रासाला सामोरं जावं लागेल. एखादी छोटीशी चुकी चांगलीच महागात पडू शकते. त्यामुळे ताक फुंकून प्या, असंच म्हणावं लागेल. पैशांची उधारी देताना विचार करा. दिलेले पैसे अडकू शकतात. या काळात मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
मीन : गोचर कालावधीत सूर्याची अवकृपा दिसून येईल. त्यामुळे काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. आईच्या तब्येतीमुळे चिंता वाढेल. आर्थिक घडी या काळात विस्कटू शकते. त्यामुळे खर्च करताना नियंत्रण ठेवा. मित्रांकडून दगाफटका होण्याची शक्यता आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)