Swapnashastra: स्वप्नात दिसत असेल चेहरा झाकलेली स्त्री; तर आयुष्यात होणार….

स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टीचा आयुष्यात काहींना काही संबंध असतो यालाच स्वप्नशास्त्रात (swapnashastra) सूचक स्वप्न असे म्हणतात. स्वप्नशास्त्राच्या मते यामागे काही विशिष्ट कारण असते. ते समल्यास भविष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो.  तर दुसरीकडे स्वप्नांबद्दल लोकांमध्ये  विविध गैरसमज आहेत. काहीजण स्वप्नांना निव्वळ योगायोग समजतात तर काहीजण त्यामागील लपलेले अर्थ शोधतात आणि काही जण रात्री पडलेल्या स्वप्नाला […]

Swapnashastra: स्वप्नात दिसत असेल चेहरा झाकलेली स्त्री; तर आयुष्यात होणार....
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 5:00 PM

स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टीचा आयुष्यात काहींना काही संबंध असतो यालाच स्वप्नशास्त्रात (swapnashastra) सूचक स्वप्न असे म्हणतात. स्वप्नशास्त्राच्या मते यामागे काही विशिष्ट कारण असते. ते समल्यास भविष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो.  तर दुसरीकडे स्वप्नांबद्दल लोकांमध्ये  विविध गैरसमज आहेत. काहीजण स्वप्नांना निव्वळ योगायोग समजतात तर काहीजण त्यामागील लपलेले अर्थ शोधतात आणि काही जण रात्री पडलेल्या स्वप्नाला स्वत:शी जोडण्याचा प्रयत्न करतात. स्वप्नात आपण अनेक गोष्टी पाहतो. यापैकी काही गोष्टी या भीतीदायक असतात किंवा काही आनंददायी असतात. पण स्वप्नांमध्ये एखादी गोष्ट किंवा व्यक्ती पाहण्याचा नेमका अर्थ काय असतो? तुम्ही कधी विचार केलाय का की, एखाद्या मुलीला स्वप्नात पाहणं म्हणजे काय? स्वप्नातील पवित्र शास्त्रात मुलींना विविध रूपांमध्ये पाहिलं असता त्याचा काय अर्थ होतो याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

जर एखादी स्त्री स्वप्नात चेहरा झाकलेली दिसत असेल तर

जर स्वप्नात एखादी स्त्री चेहरा झाकलेली किंवा मुखवटा घातलेली दिसली तर ते स्वप्नशास्त्रानुसार अशुभ आहे. स्वप्नशास्त्रानुसार, जवळचा नातेवाईक किंवा ओळखीचा माणूस तुम्हाला फसवू शकतो असा स्वप्न शास्त्राचा अर्थ आहे. यासाठी तुम्ही सावध असणं आवश्यक आहे

हे सुद्धा वाचा

सुंदर मुलगी स्वप्नात हसताना दिसत असेल तर

हसत असलेली सुंदर मुलगी कोणाला आवडत नाही. पण जेव्हा आपल्याला समजतं की, ते फक्त एक स्वप्न आहे, तर आपला मूड ऑफ होतो. परंतु हे एक चिन्ह आहे की, आपल्या करिअरमध्ये, नोकरीमध्ये आणि व्यवसायात काहीतरी चांगलं होणार आहे. याशिवाय वैवाहिक आणि प्रेमसंबंध आणखी मजबूत होणार असल्याचे हे संकेत आहेत.

लाल पदर घेतलेली स्त्री

स्वप्नात अशी सुंदर वधू पाहता तेव्हा आनंद होतो हे स्वाभाविक आहे. स्वप्नातील शास्त्रानुसार, अशा स्वप्नांचं लक्षण असू शकतं की, आपल्या घरात लवकरच एक चांगली बातमी येणार आहे. कदाचित एखादी स्त्री आई होणार असल्याची बातमी मिळू शकते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.