Swapnashastra: तुम्हालाही पडत असतील असे स्वप्न तर होऊ शकतो धनलाभ!

| Updated on: Jul 24, 2022 | 4:30 PM

स्वप्न हे प्रत्येकालाच पडतात. स्वप्न म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे.  माणूस झोपेत असताना अनेक वेळा स्वप्न पाहतो. त्यातील काही स्वप्ने (Dream Astrology) त्याला आठवतात, तर बहुतेक स्वप्न तो उठल्यानंतर विसरतो. स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात दिसणार्‍या गोष्टींचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो. स्वप्ने आपल्याला आपल्या भविष्याबद्दल संकेत देतात. स्वप्नांचा अर्थ चांगला आणि वाईट असू शकतो. […]

Swapnashastra: तुम्हालाही पडत असतील असे स्वप्न तर होऊ शकतो धनलाभ!
Follow us on

स्वप्न हे प्रत्येकालाच पडतात. स्वप्न म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे.  माणूस झोपेत असताना अनेक वेळा स्वप्न पाहतो. त्यातील काही स्वप्ने (Dream Astrology) त्याला आठवतात, तर बहुतेक स्वप्न तो उठल्यानंतर विसरतो. स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात दिसणार्‍या गोष्टींचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो. स्वप्ने आपल्याला आपल्या भविष्याबद्दल संकेत देतात. स्वप्नांचा अर्थ चांगला आणि वाईट असू शकतो. आज येथे आपण अशाच काही स्वप्नांबद्दल बोलणार आहोत जे येणाऱ्या चांगल्या काळाचे संकेत मानले जातात.

  1. स्वप्नात तेजस्वी सूर्यप्रकाश दिसणे: जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात तेजस्वी सूर्यप्रकाश दिसला तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे. हे स्वप्न संकटांचा अंत दर्शवते. कदाचित हे स्वप्न पाहिल्यानंतर तुम्हाला प्रमोशन मिळेल.
  2. स्वप्नात अंत्ययात्रा पाहणे : जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात अंत्ययात्रा निघताना दिसला तर हे स्वप्न पाहून तो घाबरला तरी चालेल, पण याचा अर्थ खूप शुभ आहे. हे स्वप्न तुमच्या आर्थिक स्थितीत जलद सुधारणा दर्शवते. तुमचे अडकलेले पैसे मिळू शकतात. जर एखाद्या आजारी व्यक्तीने हे स्वप्न पाहिले तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जुन्या आजारापासून आराम मिळणार आहे.
  3. स्वप्नात विमानाने प्रवास करणे : जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात स्वतःला विमानात प्रवास करताना पाहिले तर हे स्वप्न शुभ असते. हे स्वप्न प्रवासातून पैसे मिळवण्याचे संकेत देते. यासोबतच कोणत्याही कामात मोठे यशही मिळू शकते.
  4. तुमच्या स्वप्नात खरेदी करणे: जर तुम्ही तुमच्या स्वप्नात स्वतःला खरेदी करताना दिसले तर याचा अर्थ तुमची आर्थिक समस्या संपणार आहे. हे स्वप्न व्यावसायिकांसाठी विशेषतः शुभ मानले जाते. हे स्वप्न देखील व्यवसायात विस्तार दर्शवते.
  5. हे सुद्धा वाचा
  6. स्वप्नात जळणारे घर पाहणे: हे स्वप्न कोणालाही घाबरवू शकते. पण याचा अर्थ चांगला आहे. जर हे स्वप्न विवाहित लोकांना येत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच मूल होणार आहे. दुसरीकडे, जर हे स्वप्न अविवाहित लोकांना येत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमचा आवडता जीवनसाथी मिळू शकेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)