Horoscope 18 May 2022: आरोग्याची काळजी घ्या, कामं वेळेवर पूर्ण करा

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल ? आजचे तारे काय सांगतात. दैनिक राशी भविष्याद्वारे आजचे राशी भविष्य आणि दिवसातील घडामोडीची माहिती जाणून घ्या.

Horoscope 18 May 2022: आरोग्याची काळजी घ्या, कामं वेळेवर पूर्ण करा
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 5:00 AM

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.हे राशीभविष्य (Horoscope) वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानां (Challenge)चा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.

मेष (Aries) –

घरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होईल. त्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहील. प्रॉपर्टी तसंत इतर कोणत्याही कामामुळे जवळच फिरायला जायचा प्लान होईल. घरातील मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद आणि प्रेम गरजेचं आहे. त्याचा मान संन्मान आदर ठेवा. कधी कधी तुमचा घाई गडबडीचा स्वभाव तुमच्या त्रासाचं कारण ठरू शकतो.हा स्वभाव बदलणं गरजेचं आहे. कोणताही महत्वपूर्ण निर्णय घेताना कोणत्याही व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. कामात सहकाऱ्यांसोबत तसंच कर्मचाऱ्यासोबत चाललेला जुना मतभेद दुर होईल. त्याने कामं फटाफट होतील. मीडिया तसंच कंम्प्युटर क्षेत्राशी निगडीत व्यवसायात लाभदायक स्थिती

लव फोकस – कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या समस्यांचा घरातील वातावरणावर परिणाम होऊ देऊ नका. प्रियकर आणि मैत्रिणींनीही एकमेकांच्या भावनांचा आदर करणे आवश्यक आहे.

खबरदारी – तब्येत ठीक राहील. आयुर्वेदिक गोष्टी घेत राहा.

शुभ रंग – केसरी

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 9

वृषभ (Taurus)-

इतरांकडून अपेक्षा न ठेवता मेहनत करून आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. कामे सुरळीत पार पडतील. तुमच्या मनोरंजक क्रियाकलापांमध्ये थोडा वेळ घालवला तर तुम्हाला नवीन ऊर्जा आणि उत्साहाची अनुभूती मिळेल. कोणतीही सिद्धी देखील शक्य आहे.कधीकधी अधिक साध्य करण्याची इच्छा आणि घाईघाईने नुकसान होऊ शकते. तुमची कामे सहजतेने पूर्ण करा. मुलांच्या हालचालींवरही बारीक लक्ष ठेवा. वेळीच योग्य ती पावले उचलल्यास परिस्थिती निवळेल. व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर ते त्वरित अंमलात आणा. बाकी सध्या चालू असलेल्या कामात कोणताही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करू नका. कार्यालयात सुरू असलेल्या अडचणी काही प्रमाणात कमी होतील.

लव फोकस – जोडीदारासोबत रोमॅण्टीक संबंध असतील. लव्ह मॅरेज करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल

खबरदारी – मायग्रेनचा त्रास होईल, थकवा जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या.

शुभ रंग – सफेद

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 5

मिथुन (Gemini)-

कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी घरातील सदस्यांचा सल्ला घेणे अनुकूल राहील. यावेळी ग्रहांची स्थिती तुमच्या अनुकूल आहे. योग्य आदर द्या. मित्र आणि नातेवाईक यांच्याशी सुसंवादही राहील. तसेच सकारात्मक विषयांवर चर्चा होईल. काही दु:खद बातमी मिळाल्याने तुम्ही भावनिकदृष्ट्या कमकुवत व्हाल. काही वेळ एकटे किंवा आध्यात्मिक ठिकाणी घालवा. भावांसोबत सुरू असलेले वाद वरिष्ठ सदस्याच्या मदतीने सोडवता येतील. टूर आणि ट्रॅव्हल्स आणि मीडियाशी संबंधित व्यवसायात सुधारणा होईल. मात्र यावेळी कामाच्या व्यवस्थेत काही सुधारणा करण्याची गरज आहे. नोकरीमध्ये कामाचा ताण जास्त असल्यामुळे तुम्हाला ओव्हरटाईम करावा लागेल.

लव फोकस – पती-पत्नीच्या नात्यात जवळीक वाढेल.

खबरदारी – भावनिक गोष्टींमुळे तब्येतीवर परिणाम होईल. मनोबल वाढविण्यासाठी ध्यान करा.

शुभ रंग – ऑंरेज

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 7

(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा. )

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.