Eknath Shinde : डान्सबार बंदी अन् लागूनच आव्हाडांच्या नावाचा उच्चार, मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन सभागृहात हशा..!

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. केवळ एक अशा नाहीतर सर्वच गुन्ह्यामंध्ये वाढ होत असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले होते. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात काय स्थिती आहे याचा दर्शनच घडवून दिले तर जिथे गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत तिथे योग्य त्या सूचनाही दिल्या जाणार असल्याचे ते म्हणाले

Eknath Shinde : डान्सबार बंदी अन् लागूनच आव्हाडांच्या नावाचा उच्चार, मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावरुन सभागृहात हशा..!
उल्हासनगरच्या अनधिकृत इमारती नियमित होणारImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 4:54 PM

मुंबई : राज्यात (Increase in crime) गु्न्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचा आरोप विरोधकांकडून सभागृहात करण्यात आला होता. यावर (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण तर दिलेच पण गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य काय उपाययोजना राबवल्या आहेत त्याचा उहापोह केला. शिवाय प्रभावी अंमलबजावणीमुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी होत असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. यातच (Dance bar) डान्सबार सुरु असल्याची एक जुनी क्लिप व्हायरल होत असल्याचे सांगत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव घेतले. आणि त्यांना हे सर्व माहित आहे असे म्हणताच सभागृहात एकच हशा उमटला..यावर आव्हाड यांनीही लागलीच आक्षेप घेतला पण याबाबत आपण काही वाईट बोलत नसल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

नेमक काय घडले सभागृहात?

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. केवळ एक अशा नाहीतर सर्वच गुन्ह्यामंध्ये वाढ होत असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले होते. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात काय स्थिती आहे याचा दर्शनच घडवून दिले तर जिथे गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत तिथे योग्य त्या सूचनाही दिल्या जाणार असल्याचे ते म्हणाले, मात्र हे सांगत असताना डान्सबार तर बंद आहेतच पण मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये काही तथ्य नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी आव्हाडांच्या नावाचा उल्लेख करुन त्यांना सर्व माहित असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये हशा झाला.

आव्हाडांच्या उत्तरानंतर सावरासावर

डान्सबारचा विषय निघताच मुख्यमंत्र्यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव घेतले. त्यामुळे समोरील बाकावर असलेले आव्हाड चांगलेच संतापले होते, पण यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री म्हणाले की, तुम्हाला केवळ माहिती आहे असं म्हटलं मी…तर जाता कुठं असं सांगितले, यावर आव्हाड हे संतपालेलेच होते पण चांगलेही सांगायचे अवघड झाल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यानी दुसऱ्या विषयाला हात घातला.

हे सुद्धा वाचा

चांगल बोलणेही वाईटच मग…

राज्यातील डान्सबार हे बंद आहेत अशी माहिती देत असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांचा हवाला देत त्यांना हे माहिती असल्याचे सांगितले, पण आव्हाड चांगलेच संतापले होते. चांगल बोलणेही वाईटच आहे, मग वाईट बोलू..दुसरं सांगू येथे सर्वांना असेही मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे डान्सबार आणि त्याला जोडूनच आव्हाड यांचे घेतलेले नाव याबरोबरच गुन्हगारीवरील स्पष्टीकरणही संपले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.