Viparit Rajyog 2023: विपरीत राजयोगामुळे तीन राशींचं नशिब पालटणार, बुध ग्रहाची मिळेल कृपा

Horoscope 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाची स्थिती खूप महत्त्वाची आहे. कारण चंद्रानंतर बुध हा सर्वात वेगाने भ्रमण करणारा ग्रह आहे. बुधाच्या स्थितीमुळे विपरीत राजयोग तयार झाला आहे. त्यामुळे तीन राशींना लाभ मिळणार आहे.

Viparit Rajyog 2023:  विपरीत राजयोगामुळे तीन राशींचं नशिब पालटणार, बुध ग्रहाची मिळेल कृपा
Viprit Rajyog 2023 : बुध ग्रहाच्या स्थितीमुळे विपरीत राजयोग तयार, तीन राशींना मिळणार पाठबळ
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 4:19 PM

मुंबई : ग्रह मंडळात ग्रहांचं भ्रमण सुरुच असतं. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासोबत स्वत:च्या स्थितीत बदल होत असतो. काही ग्रह वेगाने, तर काही ग्रह मंद गतीने भ्रमण करतात. त्यामुळे त्याचा परिणाम राशीचक्रावर दिसून येतो. काही ग्रहांकडून शुभ तर काही ग्रहांकडून अशुभ प्रभाव सहन करावे लागतात. एकंदरीत पाहिलं तर ग्रहमंडळातील प्रत्येक ग्रह शुभ स्थितीत असेल असं होत नाही. पण जे ग्रह शुभ असतात त्याच्याकडून शुभ परिणाम मिळतात. ग्रहांचा राजकुमार असलेला बुध ग्रह 24 ऑगस्टपासून वक्री अवस्थेत आहे. या स्थितीमुळे विपरीत राजयोग तयार झाला आहे. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. या कालावधीत अचानक धनलाभ होऊ शकतो. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना लाभ मिळेल ते…

या तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार

मीन : या राशीच्या विपरीत राजयोगाचा फायदा होणार आहे. बुध ग्रह सूर्यासोबत वक्री अवस्थेत आहे. त्याचबरोबर शनिची दृष्टीही पडत आहेत. त्यामुळे या राशीच्या जातकांना खास लाभ मिळणार आहे. या कालावधीत प्रॉपर्टी आणि वाहन खरेदीचा योग जुळून येणार आहे. तसेच भौतिक सुखांची प्राप्ती या काळात होईल. पत्नीकडून चांगली साथ मिळेल आणि पार्टनरशिपच्या धंद्यात चांगलं यश मिळेल.

मकर : या राशीच्या अष्टम स्थानात शनि वक्री आहेत आणि वक्री आहे. दुसरीकडे शनि आणि राहुची दृष्टीही पडत आहे. या कालावधीत काही इच्छाही पूर्ण होतील. शेअर बाजारातील गुंतवणूक फलदायी ठरेल. सोने चांदी खरेदी करू शकता. प्रॉपर्टी खरेदी विक्री करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल. या कालावधीत उत्पन्नात वाढ होऊ शकते. प्रेम प्रकरणातील नातं आणखी घट्ट होणार आहे.

कन्या : विपरीत राजयोगचा फायदा कन्या राशीच्या जातकांना होईल. आर्थिक स्थिती या कालावधीत सुधारेल. पार्टनरशिपच्या धंद्यात असलेल्यांना पार्टनरची उत्तम साथ मिळेल. कमोडिटी आणि शेअर बाजार व्यवहार करणाऱ्यांना यश मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. पण आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. रिलेशनशिपमध्ये असाल तर पार्टनरसोबत क्वालिटी टाइम घालवाल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.