Solar Eclipse April 2022 | वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणात होणार या 4 राशींच्या व्यक्तींना फायदा! जाणून घ्या तुमची रास यामध्ये आहे का ?

हिंदू (Hindu) धर्मात सूर्यग्रहणाला (Surya Grahan 2022) विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्याच प्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सूर्यग्रहण एक महत्त्वाची घटना आहे.

Solar Eclipse April 2022 | वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणात होणार या 4 राशींच्या व्यक्तींना फायदा! जाणून घ्या तुमची रास यामध्ये आहे का ?
solar eclipse
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 9:28 AM

मुंबई : हिंदू (Hindu) धर्मात सूर्यग्रहणाला (Surya Grahan 2022) विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्याच प्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सूर्यग्रहण एक महत्त्वाची घटना आहे. पुराणानुसार सूर्यग्रहणाच्या काळात कोणते ही शुभ कार्य केले जात नाही.दरवर्षीप्रमाणे 2022 मध्येही ग्रहण होणार आहे. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना तो सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान येतो. ही चंद्र (Moon) व सूर्य यांची युती असते. अनुकूल परिस्थितीत चंद्र, सूर्य व पृथ्वी या तिन्ही गोलांचे मध्यबिंदू कधीकधी एका रेषेत येतात. अशा वेळी चंद्र आड आल्यामुळे पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्य काहीसा किंवा संपूर्ण दिसेनासा होतो. या आविष्काराला सूर्यग्रहण म्हणतात. 2022 मध्ये एप्रिल महिन्यात पहिले सूर्यग्रहण होणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून एप्रिल महिना खूप खास मानला जातो. या महिन्यात सर्व 9 ग्रहांची राशी बदलणार आहेत. या महिन्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच 30 एप्रिलला वर्षातील पहिले सूर्यग्रहण देखील होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे बदल आणि ग्रहण ही खगोलीय घटना आहे. 30 एप्रिल रोजी होणारे सूर्यग्रहण मेष राशीत होणार आहे. राशीच्या 4 राशींना या सूर्यग्रहणाचा सर्वाधिक फायदा होणार आहे.

सूर्यग्रहणाचा या राशींवर सकारात्मक प्रभाव पडेल

वृषभ : या राशीच्या लोकांवर सूर्यग्रहणाचा शुभ प्रभाव दिसून येईल. नोकरी-रोजगाराच्या कामात येणारे अडथळे दूर होतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. पैसे मिळवण्याचे अनेक मार्ग असतील. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. हा काळ तुमच्यासाठी खूप खास असणार आहे.

कर्क : सूर्यग्रहणाचा शुभ प्रभाव कर्क राशीच्या लोकांवरही पडेल. सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे नोकरीत सकारात्मक बदल दिसून येतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिक योजना यशस्वी होतील. प्रवासातून पैसे मिळू शकतात. या काळात तुम्हाला नविन संधी उपलब्ध होऊ शकतील.

तूळ : तूळ राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण शुभ राहील. ग्रहणाच्या प्रभावामुळे नशीब वाढेल. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. याशिवाय व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळू शकतो.

धनु : धनु राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण शुभ राहील. लाभाच्या अनेक संधी मिळतील. सरकारी कामात यश मिळेल. यासोबतच नशिबाचीही पूर्ण साथ मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे सिद्ध होईल. या राशींच्या लोकांसाठी

कधी होणार पहिले सूर्यग्रहण

पंचांगनुसार, वर्षातील पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. रात्री 12.15 पासून सूर्यग्रहण सुरू होईल. जो 01 मे रोजी पहाटे 4:07 वाजता संपेल. हे सूर्यग्रहण मेष राशीत होणार आहे. हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही . त्यामुळे सुतक लागणार नाही.

संबंधीत बातम्या :

Zodiac | गुरू देणार आयुष्याला दिशा, 12 वर्षानी गुरू कराणार स्वामी राशीत प्रवेश

Zodiac | महाकंजूस असतात या 4 राशीचे लोक,अफाट संपत्ती मिळवूनही पैसे जपून ठेवतात

Zodiac| 30 वर्षांनंतर 29 एप्रिला शनी करणार स्वराशी कुंभमध्ये प्रवेश, या राशींवर होणार परिणाम

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.