Daily Horoscope 03 June 2022: घरात आनंदाचे वातावरण राहील, राग आणि अहंकारावर नियंत्रण ठेवा

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल ? आजचे तारे काय सांगतात. दैनिक राशी भविष्याद्वारे आजचे राशी भविष्य आणि दिवसातील घडामोडीची माहिती जाणून घ्या.

Daily Horoscope 03 June 2022: घरात आनंदाचे वातावरण राहील, राग आणि अहंकारावर नियंत्रण ठेवा
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 5:10 AM

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.

तुळ (Libra) –

आज, बाहेरील कामांवर जास्त लक्ष केंद्रित करा. तसंच तुमची कामं नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करा. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. आणि उत्पन्नाचे साधनही चांगले असेल.काही वेळा तुमच्या निष्काळजीपणामुळे काही उपलब्ध झालेल्या संधी, यश हाताबाहेर जाऊ शकते. यामुळे स्वभावात विनाकारण राग आणि चिडचिडेपणा राहील. तुमचा आत्मविश्वास आणि एनर्जी कायम टिकवून ठेवणं महत्त्वाचे आहे.कार्यक्षेत्रातील सहकारी आणि कर्मचाऱ्यांवर जास्त विश्वास न ठेवता सर्व निर्णय स्वतः घ्या. कारण दुसऱ्याच्या सल्ल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. नोकरदार लोकांवर आज कामाचा ताण जास्त असेल.

लव फोकस- जोडीदाराचे सहकार्य तुमच्या कामात लाभदायक ठरेल. आणि तुमच्या नात्यातही गोडवा येईल.

हे सुद्धा वाचा

खबरदारी- नकारात्मक विचारांमुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो. ज्याचा तुमच्या कामाच्या क्षमतेवर परिणाम होईल.

शुभ रंग – गुलाबी

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 6

वृश्चिक (Scorpio) –

प्रॉपर्टीशी संबंधित कोणतेही काम करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. गृहोपयोगी वस्तूंची शॉपिंगही होईल. तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही जे बदल करत आहात ते तुमच्या आरोग्यात आणि व्यक्तिमत्त्वात खूप सुधारणा घडवून आणतील.विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येणार नाही. ज्यामुळे समस्या उद्भवू शकतात. काही जुने नकारात्मक विषय पुन्हा उफाळून आल्याने जवळच्या नातेवाईकांशी संबंध खराब होण्याचीही शक्यता आहे.आज कामाच्या ठिकाणी कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना त्रास होऊ शकतो. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे चांगले. कामाच्या जास्त ताणामुळे सरकारी नोकरी करणाऱ्यांना ओव्हरटाईमही करावा लागू शकतो.

लव फोकस- प्रेम संबंधात भावनिकदृष्ट्या काही तणाव निर्माण होऊ शकतो. राग आणि अहंकारावर नियंत्रण ठेवा.

खबरदारी- काहींना थकवा आणि सुस्त वाटेल. ध्यान आणि योगासनांकडे अधिक लक्ष द्या. ध्यानाने खूप शांत आणि प्रसन्न वाटेल.

शुभ रंग – लाल

भाग्यवान अक्षर-

अनुकूल क्रमांक- 9

धनु (Sagittarius)-

घराचे रिनोव्हेशन किंवा सुधारणा यासारख्या योजना केल्या जातील. आर्किटेक्टशी सल्लामसलत करण्याचे सुनिश्चित करा. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रत्येक काम करण्याआधी बजेट तयार करणे फार महत्वाचे आहे.तुमच्या सामानाची स्वतः काळजी घ्या, चोरीला जाण्याची किंवा हरवण्याची शक्यता असते. जवळच्या नातेवाईक किंवा भावासोबत मालमत्तेच्या बाबतीत वाद होण्याचीही शक्यता आहे.घरामध्ये आणि कामातही व्यस्तता राहील. नोकरदारांच्या कामांवर बारीकाईने लक्ष द्या, निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते. अधिकार्‍यांच्या नकारात्मक वृत्तीमुळे नोकरदार लोकांना त्रास होऊ शकतो.

लव फोकस- घरातील वातावरण संतुलित ठेवण्यासाठी आधी तुमच्या वागण्यात समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे.

खबरदारी- चुकीच्या आहारामुळे पचनक्रिया बिघडू शकते. योग्य आहार घ्या. अचरट खाणं टाळा.

शुभ रंग- पिवळा

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 3

लेखकाबद्दल: डॉ. अजय भांबी हे ज्योतिषशास्त्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. डॉ. भांबी हे नक्षत्र ध्यानाचे विशेषज्ञ आणि उपचार करणारे देखील आहेत. पंडित भांबी यांची ज्योतिषी म्हणून ख्याती जगभर पसरली आहे. त्यांनी इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तके लिहिली आहेत. ते अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रे आणि मासिकांसाठी लेखही लिहितात.थायलंडच्या उपपंतप्रधानांच्या हस्ते बँकॉकमध्ये वर्ल्ड आयकॉन अवॉर्ड 2018 ने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना अखिल भारतीय ज्योतिष परिषदेत जीवनगौरव पुरस्कारही मिळाला आहे.

(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा.)

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.