Baba Venga : 2024 च्या या 3 घटना खऱ्या ठरल्या, आता 5 राशींच्या लोकांसाठी बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी, हात लावणार त्याचं सोनं
बाबा वेंगा यांनी 2024 वर्षाबाबत ज्या काही भविष्यवाणी केल्या होत्या, त्यातील तीन भविष्यवाणी खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो.
बाबा वेंगा यांचा जन्म बुल्गारियामध्ये झाला होता. वादळात सापडल्यामुळे त्यांना आपली दृष्टी गमावावी लागली अशी कथा आहे. एक प्रसिद्ध भविष्यवेत्ता अशी बाबा वेंगा यांची जगात ओळख आहे. बाबा वेंगा यांनी आपल्या मृत्यूपूर्वी अनेक घटनांबद्दल भाकीत केली आहेत, यातील काही भविष्यवाणी खऱ्या ठरल्याचा देखील दावा करण्यात येतो. अमेरिकेवर झालेल्या 9/11 च्या हल्ल्याबाबत देखील त्यांनी आधीच भविष्यवाणी करून ठेवली होती, असं देखील म्हटलं जातं.
बाबा वेंगा यांनी 2024 वर्षाबाबत ज्या काही भविष्यवाणी केल्या होत्या, त्यातील तीन भविष्यवाणी खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो. बाबा वेंगा यांनी म्हटलं होतं की 2024 मध्ये जागतिक आर्थिक संकट, वातावरणी बदलांमुळे निर्माण झालेल्या संकटाचा जगाला सामना करावा लागेल. तसेच या वर्षी एखाद्या दुर्धर रोगावर मोठं संशोधन होऊ शकतं, बाबा वेंगा यांच्या या तीन भविष्यवाणी खऱ्या ठरल्याचा दावा करण्यात येतो.
जागतिक आर्थिक संकटाबाबत भाकीत करताना बाबा वेंगा यांनी म्हटलं होतं की, जगातिक स्तरावर निर्माण झालेला राजकीय दबाव, बदलत असलेले आर्थिक सत्ता केंद्र आणि काही देशांवर वाढत असलेला कर्जाचा दबाव यामुळे जगाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.बाबा वेंगाची ही भविष्यवाणी खरी होताना दिसत आहे. अमेरिकेला मंदीची भीती सतावत आहे. जरी तशी अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी देखील अर्थतज्ज्ञांच्या मते, चलनवाढ, ताळेबंदी आणि वाढत्या व्याज दरामुळे अमेरिकेत मंदीची स्थिती निर्माण होऊ शकते.वातावरणीय बदलामुळे जगावर संकट याबाबत बोलताना बाबा वेंगा यांनी सांगितलं होतं की अनेक देशांना महापूरा सारख्या संकटांचा सामना करावा लागेल. 2024 मध्ये अनेक देशांना महापुराचा तडाखा बसला.
दरम्यान एखाद्या दुर्धर आजारावर संशोधन करण्यात यश येईल अशी तिसरी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली होती, ती देखील खरी ठरताना दिसत आहे. गर्भाशय मुखाच्या कॅन्सरसंदर्भातील औषध संशोधनामध्ये शास्त्रज्ञांना मोठं यश प्राप्त झालं आहे.
दरम्यान 2025 संदर्भात देखील बाबा वेंगा यांनी अनेक भविष्यवाणी केल्या आहेत. त्यांच्या एका भविष्यवानीनुसार मेष, कुंभ, वृषभ, कर्क आणि मिथून या राशींच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष गोल्डन इअर राहाणार आहे. या राशीच्या लोकांसाठी 100 वर्षात प्रथम असा दुर्मिळ योग निर्माण झाला आहे. या राशींच्या लोकांनी कोणतंही काम हाती घेतलं तर ते या वर्षात पूर्ण होणार आहे.अनपेक्षित धनाचा लाभ असल्याचं देखील बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)