Palmistry : तळहातावरील या 6 चिन्हांमुळे तुम्ही होता मालामाल! काय सांगतं हस्तरेखाशास्त्र जाणून घ्या

तळहातावरील चिन्हांच्या विद्येला हस्तसामुद्रिक म्हणतात.ही भविष्य बघण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमधली एक लोकप्रिय पद्धत आहे. तळहातांवरच्या रेषा, उंचवटे यांच्या अभ्यासातून ही पद्धत विकसित झाली आहे.

Palmistry : तळहातावरील या 6 चिन्हांमुळे तुम्ही होता मालामाल! काय सांगतं हस्तरेखाशास्त्र जाणून घ्या
तळहातावरील सहा चिन्हांचा अर्थ नीट समजून घ्या, हस्तरेखाशास्त्रानुसार मिळते नशिबाची साथ
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 4:10 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रातील कोष्टकाप्रमाणे हस्तरेखाशास्त्रात तळहातावरील रेषा आणि चिन्हं बरंच काही सांगून जातात. तळहातावरील चिन्हांच्या विद्येला हस्तसामुद्रिक म्हणतात.ही भविष्य बघण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमधली एक लोकप्रिय पद्धत आहे. तळहातांवरच्या रेषा, उंचवटे यांच्या अभ्यासातून ही पद्धत विकसित झाली आहे. तळहातावरील उंचवटे, बोटांची रचना, खुणा यामुळे भाकीत वर्तवलं जातं. हस्तरेखाशास्त्रानुसरा तळाहातावरील काही चिन्हं तुम्हाला भविष्याचे संकेत देतात. तुम्ही किती नशिबवान आहात आणि भविष्यात श्रीमंतीबाबत सूचना देतात. अशाच काही चिन्हांचा उल्लेख हस्तरेखाशास्त्रात करण्यात आला आहे. यामुळे जातकांना जीवनात सर्व सुख सुविधा यांची प्राप्ती होते. कोणतंही आर्थिक अडचण सहजासहजी भेडसावत नाही. विष्णूपुराणानुसार, हे शास्त्र लक्ष्मीने विष्णूस सांगितले आणि ते समुद्र देवतेने ऐकून त्याचा प्रचार केला असे म्हटले जाते.त्यामुळे याला ‘हस्तमुद्रिका शास्त्र’ असे म्हणतात.

हस्तरेखाशास्त्रनुसार तळहातावरील खुणा

माशाचं चिन्ह – हस्तरेखाशास्त्रानुसार तळहातावर माशाचं चिन्ह असणं शुभ मानलं जातं. अशा जातकांकडे पैशांची कोणतीच कमतरता राहात नाही. यांच्याकडे भरपूर पैसा खेळत राहतो. तसेच विदेश प्रवासाची शक्यता असते. अशा लोकांचं जीवन सुखकर असतं.

हत्तीचं चिन्ह – तळहातावर हत्तीचं चिन्ह असल्यास असा जातक बुद्धीवंत असल्याचं मानलं जातं. अशी लोकं बुद्धीच्या जोरावर बराच पैसा कमवतात.त्यामुळे या लोकांच्या जीवनात तशी कोणतीच अडचण येत नाही.

पालखीचं चिन्ह – काही लोकांच्या हातावर पालखीचं चिन्हं असतं. हे चिन्ह देवी लक्ष्मीशी निगडीत असल्याचं मानलं जातं. हे चिन्हं काही भाग्यवंत लोकांच्या हातावरच असतं. असे लोक शांत आणि धैर्यवान असतात. लग्झरी जीवन जगण्यासोबत भौतिक सुख सुविधा यांना सहज मिळतात.

स्वास्तिक चिन्ह – हिंदू धर्मात स्वास्तिक चिन्हं शुभ मानलं जातं. हे चिन्ह हातावर असलं की ती व्यक्ती लहानपणापासून आरामाचं जीवन जगते. तसेच हात घालेल त्या कामात सहज यश मिळतं. या व्यक्ती मेहनती आणि चिकित्सक वृत्तीच्या असतात. समाजात यांना मानसन्मान मिळतो.

कलश चिन्ह – जे लोक आधात्मिक जीवनशैलीशी जोडलेले असतात त्यांच्या हातावर कलशाचं चिन्हं असत. तसेच यांच्या बोलण्यातही गोडवा दिसून येतो. त्यामुळे समाजात यांना चांगलं स्थान असतं. सुख, वैभव आणि धनाची काहीच कमतरता नसते.

सूर्य चिन्ह – सूर्यदेवांना ग्रहमंडळात राजाचा दर्जा देण्यात आला आहे.त्यामुळे हातावर सूर्याचं चिन्ह असलेले जातक राजासारखं जीवन जगतात. समाजात उच्च पदावर राहून मानसन्मान मिळवतात. याचं आयुष्य सूर्यासारखं उज्ज्वल असतं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.