September born babies: सप्टेंबर महिन्यात जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये असतात ‘ हे ‘ खास गुण !

September born babies: सप्टेंबर महिन्यात जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये काही खास गुण असतात. ज्यामुळे ती इतर मुलांपेक्षा वेगळी ठरतात. तुमचे मूलही सप्टेंबर महिन्यात जन्मले आहे का ? जाणून घ्या विशेष गोष्टी..

September born babies: सप्टेंबर महिन्यात जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये असतात ' हे ' खास गुण !
हे आहेत खास गुणImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 12:26 PM

September born babies:  प्रत्येक आई-वडिलांसाठी त्यांचं बाळ (babies) खूप खास असतं. त्यांचे खेळ, त्याच्या खोड्या, हसणं, सगळंच पालकांना खूप आवडतं. ज्या दिवशी आपल्या मुलाचा अथवा मुलीचा जन्म होतो, तो दिवस प्रत्येक आई-वडिलांसाठी (parents) अतिशय खास असतो. तुमचं मूल कसं आहे, कसं वागतं, हे बरचंस त्याचं पालनपोषण कसं होतं, यावर पण अवलंबून असतं. तुमचं मूल कोणत्या महिन्यात जन्माला आलं आहे, यावर त्याचं वागणं, बोलणं, त्याचं भविष्य अवलंबून असतं. हे संशोधनातून समोर आलं आहे.

या मुलांमध्ये विशेष गुण

कोणतही मूल मोठेपणी चांगली व्यक्ती (good person) बनावे यासाठी आई-वडिलांनी त्याच्यावर चांगले संस्कार करणे खूप महत्वाचे ठरते. मात्र हे फक्त पालकांच्या संस्कारांवरच अवलंबून नसते. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही उपजत गुणही असतात. सप्टेंबर महिन्यात जन्माला येणारी मुलं (September born babies) इतर मुलांपेक्षा थोडी वेगळी असतात, असे मानले जाते. जे गुण (qualities) सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात, ते इतरांमध्ये नसतात, असेही म्हटले जाते. तुमचे मूलही सप्टेंबर महिन्यात जन्मले आहे का ? सप्टेंबर महिन्यात जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये काय विशेष गुण असतात, हे जाणून घेऊया.

सप्टेंबर महिन्यातील मुलं खुल्या विचारांची

जर तुमचा जन्म सप्टेंबर महिन्यातील असेल, तर तुम्हाला हा गुण विशेष आवडेल. या महिन्यात जन्माला येणारी मुलं ही ओपन माइंडेड म्हणजेच खुल्या विचारांची असतात आणि रुढीवादी विचांरापासून लांब राहतात. एखाद्या व्यक्तीला दुखावणे किंवा कोणाला जज करणे (त्याच्याबद्दल आधीच मत तयार करणे) असे अवगुण त्यांच्यामध्ये नसतात. या व्यक्ती जुन्या विचारांच्या लोकांपासून, योग्य अंतर ठेवून वागतात.

हे सुद्धा वाचा

नेहमी सत्याची बाजू घेतात

बच्चे मन के सच्चे होते है, असं म्हटलं जातं. पण सप्टेंबर महिन्यात जन्माला येणारी मुलं दृढ निश्चय करून सत्याची साथ देतात. खोटं बोलणारी माणसं त्यांना मुळीच आवडत नाहीत. त्यांच्यावर कितीही दबाव आला तरी ते कधीच खोटं बोलत नाही आणि नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहतात. ते सत्यावर इतके ठाम राहतात, की जगातील कोणतीच शक्ती त्यांना घाबरवू शकत नाही.

अतिशय मेहनती

सप्टेंबर महिन्यात जन्माला येणाऱ्या लोकांचा एक वेगळा गुण म्हणजे ते श्रम अथवा मेहनत करण्यास घाबरत नाहीत. स्वत:च्या बळावर काही करून दाखवू असा विश्वास त्यांना असतो. लहानपणापासूनच ते त्यांची सर्व कामे, उदा- शाळेचा अभ्यास वगैरे, स्वत: पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. हातातलं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांना चैन पडत नाही.

छोट्या-छोट्या गोष्टींकडे असते लक्ष

या महिन्यात जन्माला येणाऱ्या मुलांचे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना अथवा गोष्टींकडे एकदम बारीक लक्ष असतं. त्यांना प्रत्येक गोष्ट परिपूर्ण (परफेक्ट) लागते आणि गुणवत्तेशी तडजोड करणे त्यांना मुळीच आवडत नाही. अनेक वेळा गोष्टींची इतक्या बारकाईने काळजी घेतल्यामुळे त्यांना चिंताही वाटू लागते, मात्र परिपूर्णतेचा ध्यास ते सोडत नाहीत.

आपल्या गोष्टी सांभाळून ठेवतात

सप्टेंबर महिन्यात जन्माला येणाऱ्या मुलांना त्यांच्या स्वत:च्या गोष्टींबद्दल खूप प्रेम वाटते. त्यांना गिफ्ट मिळालेली खेळणी वर्षानुवर्षे जपून ठेवलेली असतात. मोठेपणीही ते त्यांच्या गोष्टींची खूप काळजी घेतात व त्या गोष्टी साफ, स्वच्छ व चांगल्या स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करतात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.