Shani Dev : या पाच राशींवर असते शनिदेवांची कृपा, साडेसाती आणि अडीचकीतही देतात कमी त्रास

ज्योतिषशास्त्रात शनिदेवांचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. शनिदेवांना पापग्रह असं संबोधलं असलं तरी ते न्यायदेवतेची भूमिका बजावतात. म्हणजेच जातकाला त्याच्या कर्मानुसार फळं देतात.

Shani Dev : या पाच राशींवर असते शनिदेवांची कृपा, साडेसाती आणि अडीचकीतही देतात कमी त्रास
शनिदेवांचा आशीर्वाद असल्याने पाच राशीचे लोकं असतात नशिबान, वाचा तुमची रास आहे का?
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 5:54 PM

मुंबई – शनिदेव म्हंटलं की चांगल्या चांगल्या लोकांना घाम फुटतो. कारण शनिच्या दरबारात कोणी छोटा अगर मोठा नाही. ते त्याच्या कर्मानुसार त्याला फळ देतात. त्यामुळे एकदा शनिदेव राशीला आले की पळता भूई थोडी होते. ज्योतिषशास्त्रात शनिदेवांच्या स्थानाकडे बारीक लक्ष ठेवलं जातं. कारण शनिदेव सर्वात धीम्या गतीने गोचर करणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तर एका राशीत फिरुन परत येण्यासाठी 30 वर्षांचा अवधी लागतो. त्यामुळे शनिदेव राशीला आले की आले मोठी उलथापालथ व्हायला सुरुवात होते.

ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना पापग्रहाचा दर्जा देण्यात आला आहे. पण असं असलं तरी त्यांना न्यायदेवता म्हणून संबोधलं गेलं आहे. ते जातकाला त्याच्या कर्मानुसार फळं देतात. जातकांना आयुष्यात एकदा तरी शनिदेवांच्या प्रकोपाला सामोरं जावं लागतं. साडेसाती, अडीचकी किंवा महादशेत शनिदेव चांगलाच दणका देतात. आर्थिक, आरोग्य आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. असं असलं तरी 12 राशींपैकी पाच राशींवर शनिदेवांची कृपा कायम असते.

या राशींवर शनिदेव असतात प्रसन्न

वृषभ – या राशीचा स्वामी शुक्र आहे. तसेच चंद्राची उच्च रास आहे. शनि आणि शुक्रामध्ये मैत्रिपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे शनिदेवांची ही आवडची रास आहे. शनिदेव भाग्य स्थान आणि कर्मस्थानाचे स्वामी आहे. त्यामुळे शनिदेव कायम या राशीवर प्रसन्न असतात. साडेसाती, अडीचकी आणि महादशेतही शनिदेव चांगली फळं देतात.

कर्क – या राशीचा स्वामी चंद्र असून जलतत्व असलेली रास आहे. त्यामुळे या राशीवर शनिदेव दुष्प्रभाव टाकत नाहीत. कुंडलीत शनि साडेसाती किंवा महादशा सुरु असेल तर मात्र थोडा त्रास होऊ शकतो.

तूळ – या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. ही शनिदेवांची उच्च स्थान असलेली रास आहे. यामुळे शनि साडेसातीत तसा प्रभाव दिसून येत नाही. पण असं असलं तरी शनिदेव न्यायदेवता आहेत हे विसरू नका.

कन्या – या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीचे तीन घरांचे स्वामी बुध, शनि आणि शुक्र आहे. त्यामुळे शनि किंवा चंद्र त्रिकोण भावात येतात. त्यामुळे शनिचा नकारात्मक प्रभाव तसा पडत नाही. पण जातकांनी आपली कर्म चांगली ठेवणं महत्त्वाचं आहे.

मीन – या राशीचा स्वामी गुरु बृहस्पती असून जलतत्व असलेली रास आहे. शनि आणि गुरु युती चांगलं फळ देणारी युती आहे. त्यामुळे साडेसातीतही शनिदेव कृपा ठेवतात. म्हणजेच नाहक त्रास देण्याऐवजी कर्मानुसार फळं देतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.