Nakshatra Parivartan 2022: सुर्य (Sun) ग्रहाला ज्योतिष शास्त्रात ग्रहांचा राजा मानले गेले आहे. सुर्यदेव आपल्या गोचर काळात नक्षत्रांमध्ये भ्रमण करत असतो. सुर्याचा नक्षत्रांसोबतचा सहयोग शुभ मानले जाते. हिंदू (Hindu) पंचागांनुसार 25 मे पासून सुर्य कृतिका नक्षत्रातून रोहिणी नक्षत्रा (Rohini Nakshatra) गोचर झाल आहे. या काळात 12 राशींवर या गोचरचा प्रभाव पडणार आहे. कुठल्या राशींवर गोचरचा जास्त प्रभाव पडणार आहे जाणून घेऊया.
सुर्य गोचरचा प्रभाव मेष राशीच्या लोकांवर दिसण्याची शक्यता आहे. य काळात मेष राशीच्या लोकांनी आपल्या शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे. तसेच तब्येतेची काळजी घेणेही गरजेचे आहे. या काळात आर्थिक संकट ओढवू शकतं. त्यामुळे गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ आहे. स्पर्धा परीक्षेत चांगला निकाल लागू शकतो. तर विवाहित लोकांच्या आयुष्यात वाद होण्याची शक्यता आहे.
सुर्य गोचरचा प्रभाव मकर राशीच्या लोकांवरही होणार आहे. विशेषतः उद्योगजक आणि नोकरी करणार्यांकनी सावध राहणे गरजेचे आहे. यावेळी मेष राशीच्या लोकांनी जपून पावलं टाकावीत. असे असले तरी काहींना या सुर्य गोचरचा फायदा होणार आहे. त्यासाठी जिभेवर ताबा हवा. विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत केल्यास यश प्राप्त होईल. नोकरी शोधणार्यां ना या काळात यश मिळण्याची शक्यता आहे.
सुर्य गोचरचा खरा फायदा मीन राशीच्या लोकांना होणार आहे. या काळात मीन राशीच्या लोकांना धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. काळजी न घेतल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना विचार करावा तरच गुंतवणूक यशस्वी होईल. नोकरीच्या ठिकाणी बढती तसेच बदलीची शक्यता आहे. या काळात वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. असे असले तरी शत्रु आणि प्रतिस्पर्ध्यांची तुमच्यांवर नजर असेल तर काळजी घ्या.
ज्योतिषाचार्यानुसार 25 मे रोजी सुर्याचा रोहिणी नक्षत्रात प्रवेश झाला आहे. यावेळी सुर्य पृथ्वीच्या अतिशय जवळ राहणार आहे. सुर्याची किरणे थेट पृथ्वीवर पडणार आहे, त्यामुळे जमीन अधिक तापणार आहे. १५ दिवस रोहिणी नक्षत्रात राहिल्यानंतर सुर्य मृग नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सुर्याची ही स्थिती फार महत्त्वाची आहे. सुर्याने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर ९ दिवस भीषण उकाडा असणार आहे. त्यामुळे २५ मे ते 2 जून हा काळ हवामानात अनेक बदल दिसणार आहेत.
(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा.)